बारामती ! वडगाव निंबाळकर येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३२ वी जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३२ व्या जयंतीनिमित्त दि. ६ सप्टेंबर रोजी वडगाव निंबाळकर ( ता .बारामती ) येथे राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक एक क्रांतीज्योत या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यान सुप्रसिद्ध व्याख्याते सागर चव्हाण पुरंदर यांनी केले . कार्यक्रमा अगोदर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराजे राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत उपसरपंच संगीता भाभी शहा ,माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य संजय साळवे, अजित भोसले ,प्रमोद कर्वे, अश्विनी खोमणे ,प्रेमलता रांगोळे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन खोमणे, जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा युवती अध्यक्ष तेजश्री भंडलकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

व्याख्यान करत असताना व्याख्याते सागर चव्हाण यांनी आपले व्याख्यानामध्ये मत मांडत असता म्हणाले जिंदगीत आई-वडिलांपेक्षा मोठे कोणीही नाही आई-वडिलांचे मान खाली होणार नाही असे आपण कुठले कृत्य करू नये अशी शिकवण आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची आहे हे त्यांनी व्याख्यान करत असताना मांडले .

या कार्यक्रमाचे आयोजन आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर चे अध्यक्ष सुनील खोमणे यांनी केले आहे . सुनील खोमणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या रीतीने करून कार्यक्रम पार पाडला . वक्ते सागर चव्हाण यांनी आपल्या व्याख्यानामार्फत उपस्थित सर्वांना राजे उमाजी नाईक यांचे लहान पासून चे त्यांच्या शेवटपर्यंत रामोशी समाजासाठी काय व कशाप्रकारे बलिदान दिले हे व्याख्याना मार्फत प्रमुख वक्ते सागर चव्हाण यांनी मांडले .

कार्यक्रमावेळी मान्यवर व एमपीएसी व यूपीएसी मध्ये उत्तीर्ण झालेल्यांचे सत्कार करण्यात आले . आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर यांच्या वतीने भीवडी येतून दि.७ रोजी क्रांतिज्योती आणण्यात येणार आहे व सायंकाळी भव्य मिरवणूक काडली जाणार आहे आणि महप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे आध्यक्ष सुनील खोमणे यांनी सांगितले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर व अमोल गायकवाड यांनी केले व कार्यक्रमाचा शेवट आभार अध्यक्ष सुनील खोमणे यांनी मानले.