• Home
  • इतर
  • समाजातील कर्तृत्ववान लोकांचा सन्मान करणे हे रोटरी चे कर्तव्य. रो. मंजू फडके
Image

समाजातील कर्तृत्ववान लोकांचा सन्मान करणे हे रोटरी चे कर्तव्य. रो. मंजू फडके

प्रतिनिधी

समाजातील ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचत नाही अशा वर्गापर्यंत शिक्षण पोहचविण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे रोटरीचे कर्तव्य आहे. समाजातील अशा लोकांना सोबत घेऊन अथवा त्यांच्या सोबत जाऊन रोटरीने आपले काम केले पाहिजे अशी भावना रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या प्रांतपाल रो. मंजू फडके यांनी व्यक्त केली.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या व्होकेशनल आणि सिनर्जी विभागाच्या वतीने शिक्षकदिनाच्या पूर्व संध्येला आयोजित करण्यात आलेल्या “व्यावसायिक गुणवत्ता “पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर व्होकेशनलचे डायरेक्टर रो.वसंतराव मालुंजकर, सिनर्जीचे डायरेक्टर रो.पुष्कराज मुळे, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे प्रथम सदस्य रो.विश्वास फडके, माजी प्रांतपाल रो.रश्मी कुलकर्णी, को डायरेक्टर रो. शिरीष पुराणिक,व्होकेशनल चेअरमन रो. शिल्पा शिंदे, झोनल डायरेक्टर रो. नितीन कुलकर्णी, रो. पंजाबराव कथे आदी मान्यवर उपस्थित होते.
रो. मंजू फडके पुढे म्हणाल्या की आज समाजाला विविध प्रकारच्या साक्षरतेची गरज असते आणि आज आपण ज्या महनीय व्यक्तींना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करीत आहोत अशा व्यक्ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून समाजाची ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. समाजासाठी काम करणाऱ्या अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणे हे रोटरीचे काम आहे. सन्मानार्थी व्यक्तींना या पुरस्कारातून पुढील कामाची ऊर्जा मिळते तर रोटरीला नव्या कार्यक्षेत्राची ओळख होते. आज ज्यांना ज्यांना रोटरी व्होकेशनल आणि सिनर्जी विभागानी सन्मानित केले आहे त्यांचे अभिनंदन करून सन्मानर्थीच्या कामात रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 ची भरीव मदत करण्याचे आश्वासन रो. मंजू फडके यांनी दिले.
यावेळी डॉ. शिवप्रसाद पाटील(रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल), अनिल व्यास (रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर), ज्योती देशमुख (रोटरी क्लब ऑफ कात्रज ), गौतम कोतवाल (रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती), मकरंद वेलणकर (रोटरी क्लब ऑफ पुणे सिनर्जी ),सुचेता फासे (रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना ), रामचंद्र आवारे (रोटरी क्लब ऑफ भोर राजगड ) आणि अमित पावसे (रोटरी क्लब ऑफ पुरंदर ) यांना सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानुबेन नानावटी स्थापत्यशास्त्र महिला महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या झोन 5 मधील सुमारे पंचवीस clubमधील रोटरी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 ची व्होकेशनल टीम, सिनर्जी टीम, झोन 5 मधील सर्व क्लबचे अध्यक्ष, सचिव, रोटेरिअन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल,रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर,रोटरी क्लब ऑफ कात्रज,रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती,रोटरी क्लब ऑफ पुणे सिनर्जी,रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना,रोटरी क्लब ऑफ भोर राजगड आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. वसंतराव मालुंजकर यांनी केले.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025