दहा तारखेच्या अजितदादा केसरी मैदानाची नियोजन बैठक उत्कर्ष फार्म निंबुत येथे श्री गौतम काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न.

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

रविवारी दिनांक 10 रोजी बारामती येथे गोजुबावी भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री गौतम शहाजीराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली  होत आहे.
याच मैदानाची आढावा बैठक उत्कर्ष फार्म श्री गौतम शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी सात तारखेला गुरुवारी सायंकाळी सात वाजता नियोजन मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंगसाठी बारामती तालुक्यातील असंख्य युवा कार्यकर्ते, बैलगाडा क्षेत्रातील नामांकित बैलगाडा मालक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नावाला शोभेल अशा पद्धतीचे मैदान गेल्या 24 वर्षांचा अनुभव पणाला लावून श्री गौतम काकडे व त्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केल्याचे यावेळी बोलताना श्री गौतम काकडे यांनी सांगितले. मैदान हे सकाळी आठ वाजता कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार आहे असे देखील यावेळी बोलताना श्री गौतम काकडे यांनी सांगितले. मैदानाचा फायनल सूर्याच्या प्रकाशात म्हणजे सायंकाळी सहा वाजता केला जाईल. प्रत्येक फाटीची रुंदी ही 16 फूट आहे. तर पल्ला हा 1100 फूट ठेवण्यात आलेला आहे. छोट्या मोठ्या सर्व बैलगाडी मालकांचा विचार करून मैदानाची आखणी केल्याचे देखील यावेळी बोलताना श्री गौतम शहाजीराव काकडे यांनी सांगितले. एक नंबरचा व 10 नंबर तास या दोन्ही साईटला बॅरीकेट लावण्यात आलेली आहेत जेणेकरून कडणी पळणाऱ्या बैलगाड्यांवरती अन्याय होणार नाही प्रेक्षकांचा त्यांना अडथळा निर्माण होणार नाही असे देखील बोलताना यावेळी श्री गौतम काकडे यांनी सांगितले.


राज्यातले भूतो ना भविष्य असे मैदान दहा तारखेला पार पडत आहे तरी या मैदानाचा सर्व बैलगाडा मालक चालक प्रेक्षक यांनी लाभ घ्यावा. असे देखील आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेली आहे. या मैदानामध्ये जो वेळेच बंधन पाळणार नाही त्याचा विचार केला जाणार नाही मग ती कोणाचीही गाडी असली तरी चालणार नाही नियम सर्वांसाठी सारखेच राहतील असे देखील यावेळी श्री गौतम काकडे यांनी बोलताना सांगितले या मैदानाच्या स्टेज वरती दिग्गज राजकीय नेत्यांची हजेरी लागणार असल्याची चर्चा युवकांमधून होत आहे. यावेळी आमच्या प्रतिनिधीने विचारले भैया आपण एकच मेसेज केला आढावा  मीटिंग  घ्यायची आहे एका मेसेज वरती आढावा मीटिंगसाठी एवढे कार्यकर्ते कसे आले. त्यावेळी श्री गौतम काकडे यांनी बोलताना सांगितले आयुष्यात येऊन कमवलेली  हीच माझी खरी संपत्ती आहे.