बारामती ! मोरगाव-बारामती रोडवर, लोणी पाटी चौकात ओबीसी आरक्षण हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन .

Uncategorized

प्रतिनिधी- फिरोज भालदार

शनिवार दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी लोणी पाटी चौक मोरगाव – बारामती रोड ता. बारामती जि. पुणे या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असा इशारा ओबीसी संघटनेच्या वतीने देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अशा अशायाचे निवेदन सुपा पोलीस स्टेशनचे मुख्य प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील यांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,यशवंत ब्रिगेड, माधव सेना, धोबी परीट संघटना ,नाभिक संघटना ,मुस्लिम संघटना तसेच बारा बलुतेदार संघटना ,भटक्या विमुक्त जातीच्या संघटना,सहभागी झाल्या होत्या. बारामती तालुक्यातील विविध गावचे ओबीसी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य ,माजी पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले होते. आंदोलनावेळी मुरलीधर ठोंबरे, माणीक काळे,बाबा चोरमले,अनिल लडकत,वैशाली सातव,गौरी पिंगळे,रोहित बनकर,देवेंद्र बनकर,यांनी आपले विचार मांडले.

महात्मा फुले समता परिषदेचे,प्रितेश गवळी ,ज्ञानेश्वर बापू कौले, पंढरीनाथ बनकर,जिल्हा अध्यक्ष अनिल लडकत,तालुका अध्यक्ष तुषार हिरवे,वैशालीताई सातव,गौरीताई पिंगळे,व्रूशाली वाडकर,निलेश टिळेकर, दत्ता लोणकर,संतोष यादव, प्रदिप लोणकर,रोहिदास आबा कुदळे,
सचिन भुजबळ,निलेश केदारी,प्रसाद नाळे,वासीम शेख,सर्व समता पदाधिकारी, महिला पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.जय मल्हार संघटनेचे नानासाहेब मदने ,चांगदेव भंडलकर,यशवंत सेनेचे प्रदेश अध्यक्ष बापुराव सोनवलकर,राजेंद्र बरकडे,सर्व पदाधिकारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते .