मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 17 October 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

चंदुकाका सराफ तर्फे लोणंदला दागिन्यांचं आपलं दुकान प्रदर्शन.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 17, 2023 1 मिनिट वाचन 8,515 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी
विश्वासहर्ता, शुद्धता आणि कामातील सचोटी या गुणामुळे चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी संपूर्ण राज्यभर ज्वेलरी क्षेत्रात ग्राहकांच्या मनात ठसा साकारला आहे सुवर्ण अलंकाराचे अ नेक दागिने घडवत महाराष्ट्राची संस्कृती जपलेली आहे असे प्रतिपादन लोणंद च्या नगराध्यक्ष सीमा खरात यांनी केले.
चंदूकाका सराफ यांनी लोणंद येथे आयोजित केलेल्या दागिन्यांचं आपलं दुकान या सोने चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी खरात बोलत होत्या . यावेळी चंदूकाका सराफ चे चेअरमन श्री किशोर कुमार शहा, सौ संचालिका नेहा किशोर कुमार शहा उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, नगरसेवक एडवोकेट गणेश शेळके वैभव खरात उद्योजक सुनील शहा दत्तात्रय शिंदे वंदना कोठारी आनंदी शहा दीपक वाबळे सर प्रदीप डुके, मार्केटिंगचे कुमार राठोड उपस्थित होते
श्री शहा नेहा शहा यांनी स्वागत केले दिनांक 19 तारखेपर्यंत प्रदर्शन लोणंद येथील जुनी पेठ नरवीर तानाजी चौक दुसरा मजला महामंत्र गोल्ड बिल्डिंग येथे सकाळी 10:30 ते रात्री 8 या वेळेस प्रदर्शन सुरू राहील
लोणंद करांनी ऑफरचा लाभ घेत आवडते दागिने घेण्यासाठी दागिन्यांचे आपलं दुकानला आवर्जून भेट द्यावी असे आव्हान चंदूकाका सराफ यांच्यातर्फे केले आहे धनंजय माने सर यांनी सूत्रसंचालन केले

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख