बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दि. १९ फेब्रुवारी रोजी वडगाव निंबाळकर मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली . जाणता राजा युवा प्रतिष्ठान आयोजित शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धा , लघुपट प्रदर्शनाच्या माध्यमातून प्राणी संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्राण्यांच्या ओळख व्हावी म्हणून त्यांच्या जीवनमानात होत असलेल्या बदलाची माहिती लघुपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आली ,
याचबरोबर विविध स्पर्धेचे आयोजन जाणता राजा युवा प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले होते .

१९ फेब्रुवारीला वडगाव निंबाळकर मध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आकर्षित सजावट करण्यात आली होती यामध्ये पारंपरिक वाद्य , ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी वडगाव निंबाळकर मधील सर्व ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते .