सोमेश्वरचे चेअरमन यांनी मु.सा. काकडे कॉलेज बाबत स्वतः आत्मपरिक्षण करावे :- श्री सतिशराव काकडे

माझा जिल्हा

प्रतिनिधी

काही दिवसांपुर्वी सोमेश्वरच्या चेअरमन यांनी वर्तमान पत्रामधुन मु.सा. काकडे कॉलेज बाबत वक्तव्य केले होते. की जी बाब न्यायालयीन असताना देखील राजकिय हेतुने कृती समितीने विचारलेल्या प्रश्नांवर स्वतःकडे कोणतीही उत्तरे नसल्याने वारंवार हेच कारण पुढे करून स्वतःच्या चुका झाकण्यासाठी कॉलेजचा मुद्दा जाणीव पुर्वक प्रसारमाध्यमांसमोर आणुन न्यायालयाचा अवमान करीत आलेले आहेत. भविष्यात त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी कन्टेंट ऑफ कोर्ट (Contempt of court) झाल्यास त्याची वैयक्तिक जबाबदारी विद्यमान चेअरमन यांची राहिल. तरी चेअरमन यांनी जाणीव पुर्वक हा विषय घेतल्याने मी कॉलेजचा अध्यक्ष या नात्याने मु.सा. काकडे कॉलेज विषयीची सत्य वस्तुस्थिती आपणासमोर आणणे माझे कर्तव्यच आहे.

मी मध्यंतरी सभासदांना मु.सा. काकडे महाविद्यालयाबाबत लवकरच भुमिका स्पष्ट करणार असल्याचा शब्द दिला होता. तसेच कारखाना व शिक्षण संस्थेसंबंधीच्या माहित्या २५ दिवसांपूर्वी मागितल्या होत्या परंतु नेहमी प्रमाणे त्या मला अद्यापपर्यंत मिळाल्या नाहीत म्हणजेच त्या माहित्या देण्यास चेअरमन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. म्हणजे चेअरमन यांनी त्यांच्या प्रेसनोटमध्ये दिलेली त्यांची स्वतःची २८ एकर जमीन व सांगितलेल्या इतर सर्व गोष्टी दिशाभुल करणाऱ्या आहेत हे स्पष्ट होते. मु.सा. काकडे महाविद्यालय व सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या दोन्ही संस्था धर्मादाय कार्यालयात वेगवेगळया नोदणीकृत आहेत मु. सा.काकडे कॉलेजचा नोंदणी क्रमांक रजि.नं. एफ / ७१६ / पुणे हा असुन श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचा रजि. नं. एफ/५४७ / पुणे हा आहे. या वरून या दोन्ही संस्था वेगवेगळ्या असुन मु.सा. काकडे महाविद्यालय व सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मु.सा. काकडे कॉलेजच्या पोटनियमाप्रमाणे या वार्षिक सर्व साधारण सभा दरवर्षी घेतली जाते व त्याची एक प्रत धर्मादाय कार्यालयात दिली जाते ही वस्तुस्थिती आहे. या उलट कारखान्याच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या पोटनियमात स्वतंत्र वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे बंधन असताना चेअरमन कारखान्याच्याच वार्षिक सर्व साधारण सभेत ऐनवेळच्या विषयात शिक्षण संस्थे संबंधी थोडी फार चर्चा करून सभा गुंडाळली जाते. हे चेअरमन विसरलेत काय?

मु.सा. काकडे कॉलेजच्या इमारतीचे कर्ज सभासदांच्या पैशातुन कर्जफेड केल्याचे चेअरमन म्हणतात. वास्तविक त्यावेळी मी मु.सा. काकडे महाविद्यालयाचा संचालकही नव्हतो मी २००३ साली कॉलेजचा अध्यक्ष झालो तेव्हा पासुन वेळोवेळी शासनाकडुन मु.सा. काकडे महाविद्यालयास जे भाडे मिळत होते ते मी त्या त्या वेळी कारखान्यास जमा केलेले आहे. त्याच्या काही जमा पावत्या देखील कॉलेज दप्तरी जमा आहेत. तसेच माझ्या कारकिर्दीच्या आगोदर सुध्दा शासनाकडुन जे पैसे येत होते ते पैसे ही कारखान्याकडे जमा होत असतीलच परंतु शासनाने भाडे बंद केल्यापासून नाईलाजास्तव कॉलेजचे भाडे देणे बंद झालेले आहे. विद्यमान चेअरमन यांनी २०१९ साली सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ३ महाविद्यालयांना शरद पवार साहेब यांचे नाव देवुन ते तीन वर्ष सभासदांपासुन का लपवुन ठेवले, वार्षिक सर्व साधारण सभेत सदर विषय का मांडला नाही, तसेच पवार साहेबांचे नाव द्यायचेच होते तर स्वतःच्या रामराजे सोसायटीचे नाव बदलुन पवार साहेबांचे नाव का दिले नाही या तिन्हीं गोष्टींचा खुलासा प्रथम जगताप यांनी करावा.

मी मु.सा काकडे कॉलेजचा अध्यक्ष झाल्यापासून आजपर्यंत कॉलेजमध्ये शैक्षणिक व भौगोलीक विकास करून कॉलेजचा सर्वागिन विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजपर्यंत गरीब, गरजु तसेच पारधी समाजातील अनेक विद्यार्थ्यांना संपुर्ण फी माफ करून मोफत शिक्षण दिले जाते. अनेक गोरगरीब व शेतकरी सभासदांची मुले कॉलेजमध्ये शिक्षण घेतात त्या मुलांची एकरक्कमी फी भरणेची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्या विद्यार्थ्यांना तीन ते चार ट्प्यांमध्ये फी भरण्यासाठी सवलत दिली जाते. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना किडा स्पधांसाठी राष्ट्रीय स्तरापर्यंत संस्थेच्या वतीने आर्थिक मदतही पुरवली जाते. कॅम्पस मधील सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये अल्पदरात चहा, नाष्टा व भोजनाची सोय केलेली आहे. महाविद्यालयामध्ये लाखो रूपये खर्चुन भव्य असे किडा मैदान तयार केलेले आहे. त्याचा उपयोग राज्यस्तरीय किडा स्पर्धा व प्रतिष्ठीत व्यक्तींना हेलीकॉप्टरव्दारे येण्या-जाण्यासाठी सदर मैदानाचा उपयोग ही होतो. गेल्या २० वर्षांत कॉलेजमध्ये अनेक नविन अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत ते पुढील प्रमाणे MA (इतिहास, मराठी व हिंदी), M.Sc (अॅनेलॅटिकल केमिस्ट्री, मायकोबायोलॉजी), B.B.A (C.A), PHD संशोधन केंद्र इतिहास, मराठी, वाणिज्य, B.Sc, तसेच महाराष्ट्र शासनाचे आठ एक वर्ष मुदतीचे लघु कालावधी कोर्सेस सुरू केले आहेत. पोलिस प्रशिक्षण केंद्र व राज्यसेवा मार्गदर्शन केंद्र तसेच स्पर्धा परिक्षा केंद्र कॉलेजमध्ये सुरू केले असुन अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. महाविद्यालयाला पुणे जिल्हा परिषदेचा क्लीन अॅन्ड ग्रीन कॅम्पस पुरस्कार २०२० साली मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाचे महाराष्ट्र हरीत सेना सदस्यत्व प्रमाणपत्र २०१८ साली मिळाले आहे. केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छता अॅक्शन प्लॅन इन्स्ट्युलेशन मान्यता प्रमाणपत्र २०२१ साली मिळालेले आहे. महाविद्यालयाने गेल्या २० ते २५ वर्षात बा.सा. काकडे सायन्स कॉलेज इमारत, रूसा इमारत, कॉन्टीन इमारत, अक्षय शिंदे सभागृह, जिमखाना इमारत, व्यावसाय अभ्यासक्रम इमारत, सौनिक व पोलिस प्रशिक्षण इमारत अशा अनेक इमारतींचे बांधकामे तसेच स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रेन वॉटर हारव्हॅस्टिींग प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, पवन उर्जा प्रकल्प, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, बाग-बगीच्या यासाठी अंदाजे ८ कोटी ५० लाख रूपये खर्च केलेले आहेत. सदर सर्व खर्च करताना महाविद्यालयाने कुठल्याही बँकेकडुन कर्ज अथवा देणगी स्वरूपात पैसे घेतलेले नाहीत महाविद्यालयाने स्वतःच्या ताकतीवर या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. महाविद्यालयात भविष्यामध्ये मुलींचे वस्तीगृह, गेस्ट हाऊस, स्वतंत्र जिमखाना, सेंट्रल डिझीटल लायबरी व स्वतंत्र PG साठी सायन्स लॅब्रोटरी असे अनेक सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार तसेच अंतरराष्ट्रीय दर्जाची पुस्तके ई-बुक, ५० हजार ग्रंथ १ लाखाहुन अधिक ई-जरनल उपलब्ध करून दिलेली आहेत. ग्रामिण भागातील इतकी मोठी ग्रंथ संपदा असणारे जिल्ह्यातील हे एकमेव ग्रंथालय आहे. महाविद्यालयाने ISO 9001: 2015 हे अंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन करून घेतलेले आहे. राष्ट्रीय मान्यता व मुल्यांकन परिषद (NAAC) यांचे कडुन सलग ४ वेळा मुल्यांकन करून घेतले आहे. त्यास २००४ साली B दर्जा, २०१२ साली B + दर्जा, २०१७ साली B ++ दर्जा व २०२३ साली A दर्जा असा सातत्याने गुणवत्तेचा चढता आलेख ठेवला आहे. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान यांचेकडुन महाविद्यालयास ग्रामिण भागातील उत्कृष्ठ महाविद्यालय असल्याने २०१८ साली इमारत बांधकाम व इतर सुविधांसाठी २ कोटी रूपयांचे अनुदान केंद्र सरकारने दिले होते.

याउलट कारखान्याच्या श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या चार महाविद्यालयांपैकी गेली २० वर्षात एकाच महाविद्यालयाने राष्ट्रीय मान्यता व मुल्यांकन परिषद (NAAC) यांचे कडुन मुल्यांकन करून घेतलेले असुन त्यास बी ग्रेडचा दुय्यम दर्जा मिळालेला आहे. तसेच उर्वरित ३ महाविद्यालयांना शासन नियमाप्रमाणे अपुऱ्या सुविधा, प्रशिक्षीत स्टाफ नसल्याने शासनाने संबंधीत ३ महाविद्यालयांचे पुनर्मुल्यांकन करणेचा प्रस्ताव स्विकारला नाही व जर शासन नियमाप्रमाणे NAAC मुल्यांकन करून घेतले नाही तर २०२३ – २४ पासुन प्रथम वर्षाच्या प्रवेशास निर्बंध लागू शकतात असे शासनाने व विद्यापिठाने लेखी पत्राव्दारे कळविले आहे. श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन झाल्यापासुन सभासदांनी शिक्षण संस्थेस शैक्षणिक सुविधांसाठी सुमारे ५५ ते ६० कोटी रूपये दिले असतानाही आजपर्यंत हे वनगेट कॅम्पस सुध्दा करू शकले नाहीत. तसेच शिक्षण संस्थेत जी नोकर भरती केली त्याची वर्तमान पत्रात कोणतीही जहिरात न देता केवळ चेअरमन व संचालक मंडळाचे जवळील व नातेवाईकांची भरती केली आहे. तसेच सचिवापासुन शिपायांपर्यंत भरमसाठ पगारावर काटकसर न करता सभासदांच्या पैशांची उधळपट्टी केलेली आहे. तसेच समारंभाच्या नावाखाली दरवर्षी ७ ते ८ लाख रूपये मंडपास खर्च करून रूपयांची उधळपट्टी केलेली आहे.

तरी चेअरमन यांनी इतर कॉलेजमध्ये लक्ष न घालता कारखान्याच्या शिक्षण संस्थेत लक्ष घालावे व यापुढे माझ्यावर वैयक्तिक व्देषापोटी चुकीचे आरोप करू नयेत. जर आपण माझ्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप केल्यास नाईलाजास्तव मागील सर्व गोष्टी पुन्हा नव्याने पुढे आणाव्या लागतील. तसेच आजपर्यंत मु. सा. काकडे महाविद्यालयास वेळोवेळी कारखान्याच्या ज्या माजी अध्यक्षांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला त्यांचा देखील योग्य वेळी समाचार घेणार आहेच. तरी चेअरमन यांनी उर्वरित राहिलेल्या दिवसांत कारखाना व सभासदांच्या हिताच्या गोष्टींवर लक्ष द्यावे.

भविष्यात शिक्षण संस्थेत राजकारण येवु नये म्हणुन मु.सा.काकडे महाविद्यालय ही विभक्त व स्वतंत्र संस्था आहे असे विद्यमान चेअरमन यांनी स्वतःच १९९१ साली संचालक असताना सुचक अनुमोदन देवुन हे सिध्द केलेले आहे. केवळ चेअरमनकडे कोणताही मुद्दा नसल्याने राजकिय हेतुने प्रेरित होवुन सभासदांना दिशाभुल करण्याचे काम थांबवावे अन्यथा मला तुमचा सविस्तर समाचार घ्यावा लागेल. परंतु आज रोजी ही बाब न्यायालयीन असल्याने मला काही मर्यादा आहेत. त्यामुळे मी जास्त सविस्तर खुलासा करू शकत नाही.