मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 31 October 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 31, 2023 1 मिनिट वाचन 8,519 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर: मु.सा. काकडे महाविद्यालयाची विद्यार्थिनी, कु.शिंदे ज्ञानदा मोहन (१२वी विज्ञान) या खेळाडू विद्यार्थिनीने अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेमध्ये १९ वर्ष वयोगट, ६५किलो वजनगटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.
जानेवारीमध्ये होणाऱ्या झारखंड-रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष मा. सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, ऋषिकेश भैय्या धुमाळ, प्रा. सुजाता भोईटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ.प्रवीण ताटे- देशमुख, डॉ.जया कदम, आय.क्यू.ए.सी. समन्वय डॉ. संजू जाधव उपप्राचार्य प्रा रविंद्र जगताप पर्यवेक्षिका प्रा. जयश्री सणस यांनी अभिनंदन केले. पुढील झारखंड- रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थिनीला प्रा.डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा. दत्तराज जगताप, तुषार मोहिते यांनी मार्गदर्शन केले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख