मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 9 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

बँकेतून पैसे काढून घरी जात असताना नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक

mnewsmarathi 09 Nov 2026 1 मिनिट वाचन 3,706 वाचन

प्रतिनिधी.

सध्या दिवाळी सणानिमित्त आर्थिक व्यवहारांसाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना, याचाच फायदा घेत एका नागरिकाची ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ३१/१०/२०२६ रोजी सकाळी सुमारे १०.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे सोमेश्वरनगर येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून दिवाळीच्या खरेदीसाठी ५५ हजार रुपये काढून घरी जात होते. बँकेत पैसे मोजत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन बसली होती. त्यानंतर फिर्यादी हे पैसे घेऊन आपल्या गाडीवरून घरी जात असताना सदर व्यक्तीने काळ्या रंगाच्या मोपेडवरून येऊन फिर्यादी यांना थांबविले. तुमच्या खिशातील नोटा खराब असून त्याऐवजी मी तुम्हाला चांगल्या नोटा बदलून देतो, असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडील ५० हजार रुपयांची रक्कम हातात घेऊन नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून घटनास्थळावरून पलायन केले.

याप्रकरणी वडगांव निंबाळकर पोलिसांनी अहोरात्र तपास करून सरफराज मानू इराणी, वय ५० वर्षे, रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा यास अटक केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सादिक इनामदार हे करीत आहेत. सदर गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस हवालदार नितीन तांबे, किरण शेलार, पोलीस शिपाई नरेंद्र यादव, आबा जाधव, निलेश जाधव, सचिन घाडगे, सूरज धोत्रे व विकास येटाळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

सणासुदीच्या काळात अनोळखी व्यक्तींकडून पैसे बदलून देणे, नोटा तपासून देणे अथवा इतर कोणत्याही बहाण्याने आर्थिक व्यवहार करण्यास सांगितल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi