• Home
  • क्राईम
  • डोक्यात दगड घालून तरुणाचा खून, गुन्हा दाखल
Image

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून, गुन्हा दाखल

प्रतिनिधी

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला आहे. सौरभ रुपेश शिंदे (वय २३, रा. राम मंदिरजवळ, आंबेगाव पठार, कात्रज, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रूपेश नामदेव शिंदे (वय ४९) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना स्वामी नारायण मंदिरापाठीमागील डोंगराखाली घडली आहे.

सौरभ हा आंबेगाव येथील रहिवासी असून कालपासून त्याचा संपर्क होत नव्हता. दरम्यान, नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी एक मृतदेह पडला असल्याची माहिती काही नागरिकांनी नऱ्हे चौकीत दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता, सौरभ याच्या डोक्यात जड वस्तू मारून त्याचा खून केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव हे करीत आहेत.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026