बारामती तालुक्यातील अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन गुटखा बंदी कायद्याची का करते पाय मल्ली?

क्राईम

संपादक – मधुकर बनसोडे.

 महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखाबंदी कायदा लागू झालेले अनेक वर्षे झाली मात्र हा कायदा फक्त कागदावरच अद्याप तरी आहे गुटखा बंदी नक्की कोणाच्या हितासाठी करण्यात आली होती? कारण या निर्णयामुळे गुटखा बंदी न होता गुटख्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे मग ही गुटखाबंदी नक्की कोणासाठी.

 बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा सर्रास विक्री केला जात आहे नक्की कोठून येतो हा गुटखा याचा तपास लागणार तरी कधी.

 अगदी छोट्या पान टपरी पासून ते किराणा दुकानापर्यंत सर्वत्र सहजपणे उपलब्ध होणारा गुटखा अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या निदर्शनास येत नाही का?. की जाणून बुजून गुटखा विक्रेत्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. काही ठिकाणी तर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरती हा गुटखा विकला जातो मात्र कारवाई होताना दिसत नाही. बारामती तालुक्यामध्ये अन्न व औषध प्रशासन, व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करावी व गुटखा विक्रेत्यांची व मेन डीलर यांच्या मुस्क्या आवळाव्यात अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे.

 या अनाधिकृत व्यवसायातून संबंधित प्रशासनातील काही लोकांना लाखो रुपयांची माया मिळत असावी?त्यामुळेच या अनाधिकृत व्यवसायाकडे लक्ष दिले जात नाही असे देखील चर्चा नागरिकांमधून होत आहे.