बारामती ! (होळ) सस्तेवाडी येथील रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे माणसांच्या बरोबर गाड्यांचे पार्टभी होत आहेत ढिले . 

माझा जिल्हा

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील (होळ) सस्तेवाडी येथे जास्त प्रमाणात वाहतुक आसणाऱ्या रस्त्यावर खड्डे असल्याने माणसांच्या बरोबर गाड्यांचे पार्ट देखील ढिले पडत आहेत . सस्तेवडीचा हा रस्ता सोमेश्वर देवस्थानाकडे देखील जात आहे या रस्त्यावर सर्वाधिक वाहतुक असून रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे तेथील स्थायी लोकांसहित तेथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील त्या रस्त्याचा वारंवार त्रास होत आहे. सस्तेवाडीच्या या रस्त्याने हायवा गाड्यांची वारंवार वाहतूक होत असल्या मुळे या रस्त्याचे हाल असे झाले आहे असे नागरिकांमधून सांगण्यात येत आहे .

 याठिकाणी रात्रीच्या वेळी दोनचाकी / चारचाकी गाडी त्या रस्त्याने गेली गाड्यांना हा खड्ड्यांचा अंदाज आला नाही तर त्या ठिकाणी गाड्यांचे नुकसाण होणार हे तर नक्कीच मात्र रस्त्यामध्ये मोठे खड्डे असल्यामुळे अपघात होण्याचे जास्त शक्यता आहे .

याठिकाणी असे बरेच चारचाकी वाहनांची अवस्था बिगडली आहे ह्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडल्याने चारचाकी वाहनाला कोटून जावे हे कळत नाही यामध्ये त्या वाहनाचे नुकसान होते .असे कीतेकदा तरी झाले आहे असे तेथील ग्रामस्थांमधून सांगण्यात आले . हा रस्ता मागील एक वर्षे झाला आम्ही असाच वहिवाटत आहे असे स्थाई लोकांकडून सांगण्यात येत आहे .

सस्तेवाडीच्या या रस्त्यावर ग्रामपंचायत प्रशासन लक्ष्य घालणार का ? का कोणाचा जीव गेल्याशिवाय तेथील प्रशासन जागे होणार नाही याकडे नागरिकांचे लक्ष्य वेधले गेले आहे .