मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 10 January 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

वंचित बहुजन आघाडीत दयानंद पिसाळ यांचा जाहीर पक्ष प्रवेश.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
January 10, 2024 1 मिनिट वाचन 8,514 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी –

देशामध्ये व महाराष्ट्र मध्ये सध्या चाललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये गोरगरीब व वंचित घटकातील कष्टकरी लोकांचे मोठ्या प्रमाणात पिळवणूक चाललेली आहे.
या परिस्थितीमध्ये गोरगरीब,कष्टकरी,वंचित व पीडित जनतेस न्याय मिळवून देण्याचे काम सध्या वंचित बहुजन आघाडी हा पक्ष करीत आहे.पक्षाचे ध्येय धोरणे व विचार पाहून आज वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष राज यशवंत कुमार,जिल्हा महासचिव सतीश साळवे,संपर्कप्रमुख अॅड.वैभव कांबळे,सचिव गोविंद कांबळे,संघटक सुजय रणदिवे,बारामती तालुकाध्यक्ष रामदास जगताप,इंदापूर तालुकाध्यक्ष मनोज साबळे व कायदेशीर सल्लागार अॅड.संतोष कांबळे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री.दयानंद पिसाळ यांनी पक्ष प्रवेश केला.
दयानंद पिसाळ हे राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत अनेक योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे.तसेच अन्यायग्रस्त,गोरगरीब,कष्टकरी लोकांना अनेक माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारे मदत मिळवून दिलेले आहे,त्यातच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष शोषित,पीडित,अन्यायग्रस्त व गोरगरीब,कष्टकरी लोकांच्या पाठीशी पूर्णपणे ठाम उभा राहतो व न्याय मिळवून देतो हे त्यांनी या पक्षाच्या माध्यमातून अनुभवले आहे.
पिसाळ यांचा तळागाळातील जनतेपर्यंत दांडगा जनसंपर्क आहे.येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकींमध्ये हा एक प्रकारे पक्षप्रवेश करून विजयाचे प्रतीक दाखवलेले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे ध्येय धोरणे व विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्याचे काम पक्ष प्रवेश दरम्यान दयानंद पिसाळ यांनी सांगितले.यावेळी ज्ञानदेव लष्कर,जगन्नाथ पिसाळ,गणपत माने,रामभाऊ चौगुले,विजय पिसाळ,सामाजिक कार्यकर्ते शेखर मासाळ व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख