माळेगाव पोलीसांनी केली चोरीचे गुन्हयातील परप्रांतीय आरोपीस अटक व मुददेमाल हस्तगत

क्राईम

प्रतिनिधी

माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे शिरवली ता. बारामती जि.पुणे या गावचे हददीतुन दिनांक- 13/08/2023 रोजी सायंकाळी 07.00 या ते दिनांक 14/08/2023 रोजी सकाळी 08.00 वा चे दरम्यान बारामती ते फलटण रोडचे कडेला उभी असलेली पोकलेन मशीन सीरीअल नं N724423 हिचा अंदाजे 2,00,000/- रू किमतीचा बुम कंट्रोलर हा राजेश मिश्रीलाल साहू वय 21 वर्ष, मुळ रा. हिनौती ता. सिहावाल जि. सिधी राज्य मध्य प्रदेश याने अप्रमाणिकपणे मुद्दाम लबाडीच्या इराद्याने, स्वताच्या फायद्याकरीता चोरी करून बोरून नेलेला आहे अशा आशयाचे श्री. महेश श्रीराम सरदार मुळ रा. मौजे कोकणवाडी मुर्तिजापूर जि. अकोला सध्या रा. फ्लॅट नं-4, काटे प्राइड अपार्टमेंट शिवनगर बारामती शहर जि.पुणे यांनी माळेगाव पोलीस ठाणे येथे दिनांक 14/08/2023 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन माळेगाव पोलीस ठाणे येथे गुर.नं- 432/2023 भा.द. वि.कलम 381 प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल झालेला होता. व सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांचेकडे दिलेला होता.

सदर गुन्हयातील संशयित आरोपी राजेश मिश्रीलाल साहु वय 21 वर्ष, मुळ रा. हिनौती ता. सिहावाल जि. सिधी राज्य- मध्य प्रदेश हा गुन्हा घडले दिनांक 14/08/2023 रोजी पासुन फरार झालेला असलेने पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी सदर गुन्हयाचे तपास दरम्यान संशयित आरोपीचे ठावठिकाण बाबत गोपनीय व तांत्रिक विश्लेषणातुन खात्रीशीर माहीती प्राप्त करुन केलेनंतर सदर गुन्हयातील आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हयातील चोरीस गेला माल हस्तगत करणेसाठी पोलीस निरीक्षक श्री. किरण अवचर सोा यांचे सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल खटावकर व पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांचे तपास पथकाने गुन्हयातील संशयित आरोपी नामे राजेश मिश्रीलाल साहु वय 21 वर्ष, मुळ रा. हिनौती ता. सिहावाल जि. सिधी राज्य- मध्य प्रदेश यांस दिनांक 15/01/2024 रोजी कृष्णा स्टोन इंडस्ट्रिज, मंगरुळ ता.उमरेड जि. नागपुर येथुन सदर गुन्हयाचे चौकशी कामी ताब्यात घेवुन त्यास माळेगाव पोलीस ठाणे येथे अटक करुन मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक- 16/01/2024 ते दिनांक- 20/01/2024 अशी पोलीस कोठडी मंजुर केलेली होती.

सदर संशयित आरोपीने पोलीस कोठडी रिमांड मध्ये असताना चोरीचा गुन्हा केलेची कबुली दिलेली असुन गुन्हयात चोरीस गेला माल एकुण अंकी 2,00,000/- अक्षरी दोन लाख रुपये किमतीचा पोकलेन मशीन पोकलेन मशीन सीरीअल नं N724423 हिचा बुम कंट्रोलर हस्तगत करणेत आलेला असुन सदर आरोपीस आज दिनांक- 20/01/2024 रोजी मा. न्यायालयात हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने दिनांक-02/02/2024 रोजी पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवणेचे आदेश दिलेले आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अंकित गोयल सोो. (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. आनंद भोईटे सोो, अपर

पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, श्री. गणेश इंगळे सोो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, श्री. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, श्री. किरण अवचर, पोलीस निरीक्षक, माळेगाव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस नाईक श्री. ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग, माळेगाव पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.