प्रतिनिधी
महाराष्ट्राचा ५७वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या पूर्वतयारीमध्ये लागलेले निरंकारी भाविक भक्तगण समागम स्थळ समतल व सुंदर बनविण्यासाठी त्यामधील प्रत्येक व्यवस्थेला अंतिम रुप देत आहेत. नागपुरच्या मिहान, सुमठाणा स्थित विशाल मैदानांवर हा तीन दिवसीय संत समागम शुक्रवार, दि. २६ जानेवारीपासून सुरु होत असून २८ जानेवारीला संपन्न होणार आहे.
मागील एक महिन्यापासून महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यांतूनही निरंकारी भक्तगणांनी समागम स्थळावर येऊन आपल्या निष्काम सेवांच्या माध्यमातून समागम स्थळाला एका सुंदर नगरीच्या रूपात परिवर्तित केले आहे. सर्व श्रद्धाळु ज्या उत्साहाने, आवडीने, भक्तिभावाने, मर्यादा अनुशासनाचे पालन करत आपल्या सेवा निभावत आहेत ते पाहून जनसामान्य अत्यंत प्रभावित आहेत. समागम स्थळाचे हे अनुपम दृश्य आजुबाजुने जाणाऱ्या वाटसरुंना आणि स्थानिक नागरिकांसाठी आकर्षण व उत्सुकतेचे केंद्र बनून राहिले आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईहून आलेल्या कलाकारांनी उभारलेले संत समागम चे मुख्य प्रवेशद्वार कलात्मकतेबरोबरच आपली भव्यता आणि दिव्यता यांचे अनुपम स्वरूप प्रदर्शित करत आहे. या व्यतिरिक्त समागम स्थळावरील अन्य व्यवस्थांची निर्मिती व सुशोभिकरण कलेमध्ये निपुण भक्तांकडून मोठ्या कुशलतेने केले जात आहे.
समागमाच्या प्रति जनजागृती
मानवतेच्या कल्याणासाठी आयोजित केलेल्या या संत समागमाचे साक्षी बनण्यासाठी समस्त भाविकांना व निरंकिारी भक्तगणांना नुक्कड नाटक, बाईक रॅली तसेच बॅनर इत्यादिच्या माध्यमातून सादर आमंत्रित केले जात आहे ज्यायोगे त्यांनी या संत समागमामध्ण्ये सहभागी होऊन आपले जीवन सार्थक करावे.
दरवर्षा प्रमाणे याही वर्षी समागमात सहभागी होणाऱ्या सर्व भक्तगणांसाठी व्यापक स्तरावर निवासी तंबू, लंगर व कॅन्टीन इत्यादीची यथोचित व्यवस्था करण्यात आली आहे. समागम स्थळावर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. प्रकाशन विभागाकडून समागम स्थळावर वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले जात आहेत. संत निरंकारी मिशनचे सचित्र दर्शन घडविण्यासाठी आकर्षक निरंकारी प्रदर्शनीचेही आयोजन केले जात आहे. हे सर्व सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनानेच शक्य झाले आहे.
भक्तिभावाने केल्या गेलेल्या या सर्व पूर्वतयारीमध्ये कुशलतेची एक सुंदर झलक पहायला मिळत आहे. निश्चितच या संत समागमामध्ये देश-विदेशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीची व सार्वभौमत्वाची छटा उमटलेली पहायला मिळेल आणि यामध्ये सहभागी होणारा प्रत्येक भाविक भक्त अलौकिक आनंदाची प्राप्ती करत सद्गुरु व संतांच्या दिव्य वाणीने प्रभावित होऊन आपल्या जीवनाच्या मूळ उद्देशाकडे प्रेमाभक्तीच्या भावनेने युक्त होऊन अग्रेसर होईल यात तिळमात्र शंका नाही.