होंडा शाईन मोटार सायकल रेकॉर्ड वरील चोर आटक बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई

क्राईम

प्रतिनिधी

          दिनांक 27/01/2024 रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने एक रेकॉर्ड वरील मोटार सायकल चोर नामे आदेश रमेश देशमुख वय 23 वर्ष रा कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. यास अटक केली . पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याने बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सुभद्रा मॉल व विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरा मधून दोन मोटरसायकल चोरी करून घेऊन गेल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सदर दोन गुण्यातील दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या आधी बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक यांनी सदर आरोपीकडून दोन मोटर सायकल जप्त केल्याआहेत .सदर आरोपी कडून एकूण *चार* मोटरसायकल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. सदर बाबतीत आरोपीवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1) बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 8/2023 भा. द.वि.कलम 379

2) बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 67/2023 भा. द.वि.कलम 379

3) बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.39/22 भादवी कलम 379

4) बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र. नं.70/23 भादवि कलम 379

या प्रमाणे गुन्हे दाखल असून सदर गुण्यामध्ये चोरी केलेल्या सर्व *होंडा* *शाईन* मोटरसायकल बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेल्या आहेत.

सदरची कामगिरी *मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्रीअंकित गोयल, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्रीआनंद भोईटे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे बारामती तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस अंमलदार राम कानगुडे व पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, शशिकांत दळवी , दत्ता मदने* यांनी केली असून सदर बाबतीत पुढील तपास महिला पोलीस हवालदार टेंबरे महिला पोलीस हवलदार आटोळे या करीत आहेत.