मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

पिंपरीत विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पोलिसांनी घेतली पाच लाखांची खंडणी

mnewsmarathi 15 Feb 2024 1 मिनिट वाचन 8,680 वाचन

प्रतिनिधी

महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात घालण्याची धमकी देत पाच लाख रुपये उकळणा-या देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा यांना अटक केली आहे. तर, पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळसह शंकर गोरडे, मुन्नास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (वय १९, रा. किवळे, पुणे. मूळ रा. झारखंड) या विद्यार्थ्याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी चौहान हा किवळे येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहतो. देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार आणि अन्य आरोपींनी मिळून चौहानकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपींनी १० फेब्रुवारी रोजी दुपारी किवळे येथील एका कॅफे मधून त्याचे अपहरण केले. तेथून मायाज लॉज, गहुंजे स्टेडियम आणि तेथून देहूरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi