मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 23 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

मुगटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश राव काकडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर.

mnewsmarathi 07 Feb 2024 1 मिनिट वाचन 8,779 वाचन

प्रतिनिधी.
विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील सुप्रतिष्ठित व्यक्तींनी केलेल्या योगदानाचा गौरव व्हावा या उद्देशाने दरवर्षी जीवनसाधना गौरव पुरस्कार विद्यापीठामार्फत दिला जातो.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ उल्लेखनीय योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सालाबाद प्रमाणे जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान करत असते. हा मानाचा समाजाला जाणारा पुरस्कार यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षातील वर्धापनाच्या दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार मुगटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश राव शिवाजीराव काकडे यांना देण्यात आलेला आहे. सर्व स्तरातून अध्यक्ष सतीश राव काकडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व पंचक्रोशीत या पुरस्कारामुळे आनंददायी वातावरण आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi