• Home
  • क्राईम
  • पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी चक्क मचाणावर लपले
Image

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी चक्क मचाणावर लपले

प्रतिनिधी

कोंढवा परिसरात एकावर हल्ला करून पसार झालेल्या पाच आरोपींना नगर जिल्ह्यातील एका गावातून अटक करण्यात आली. पोलिसांचे पथक मागावर असल्याचे समजताच आरोपी शेतात मचाण बांधून तेथे राहत होते.

शहबाज मोइउद्दीन खान (वय ३०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी), बालाजी मिन्ना मंगाली (वय ३५, रा. येवलेवाडी), सूरज राजेंद्र सरतापे (वय २५, रा. चिमटा वस्ती, फातिमानगर), जुबेर कद्दुस कुरेशी (वय ३५, रा. कासेवाडी, भवानी पेठ), रॉकी ॲथोंनी (वय ३१, रा. वानवडी बाजार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कोंढव्यातील समतानगर एका तरुणावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. आरोपी शहबाज याचे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बेलापूर येथे शेत आहे. शहबाज आणि त्याचे साथीदार शेतात मचान बांधून तेथे राहत होते. पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. शहबाज आणि साथीदार बेलापूर गावातील शेतात वास्तव्यास असून, पोलिसांच्या नजरेस पडू नये म्हणून ते रात्री मचाणावर झोपायचे. या बाबतची माहिती पोलीस हवालदार सतीश चव्हाण आणि विशाल मेमाणे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आरोपींना बेलापूर गावातून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, बालाजी डिगोळे, सतीश चव्हाण, लवेश शिंदे, निलेश देसाई, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे यांनी ही कारवाई केली.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026