• Home
  • क्राईम
  • सोमवार पेठेतील गुंडाकडून साडेतीन कोटीचे मेफेड्रोन जप्त; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Image

सोमवार पेठेतील गुंडाकडून साडेतीन कोटीचे मेफेड्रोन जप्त; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

प्रतिनिधी

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणी सोमवार पेठेतील गुंड वैभव उर्फ पिंट्या माने याच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून, अमली पदार्थ तस्करीमागे आंतरराष्ट्रीय तस्कर असल्याचा संशय आहे.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि साथीदारांकडून ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. गुंड वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याचे साथीदार अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त मनोज पवार, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि पथकाने ही कारवाई केली

पोलीस कर्मचारी विठ्ठल साळुंखे यांनी अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी. दिली.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026