• Home
  • क्राईम
  • वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु
Image

वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु

प्रतिनिधी

अपमानास्पद वागणूक दिल्याने वाघोली पोलीस चौकीच्या आवारात पेटवून घेणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यु झाला. रोहिदास अशोक जाधव (वय ३२, रा. वाघोली) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

वाघोली पोलीस चौकीसमोर ही घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यात जाधव गंभीर भाजले होते. जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाघोली पोलीस चौकीतील सहायक फौजदार अशोक घेगडे, हवालदार कैलास उगले आणि हवालदार महेंद्र शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

लोणीकंद पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. रोहिदास जाधव यांनी पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह १५ जणांवर जातीवाचक शिवीगाळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली केली होती.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026