• Home
  • क्राईम
  • शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, पोलिसांकडून सुखरूप सुटका; अपहरण करणाऱ्यांचा शोध सुरू
Image

शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, पोलिसांकडून सुखरूप सुटका; अपहरण करणाऱ्यांचा शोध सुरू

प्रतिनिधी

भारती विद्यापीठ परिसरामधून एका शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने तपास करून मुलाची सुटका केली.

अपहरणकर्ते पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दहा वर्षांच्या मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. याबाबत त्याच्या पालकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मुलाचे अपहरण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर भारती विद्यापीठ आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला.

पोलीस मागावर असल्याचे समजताच मुलाला सोडून आरोपी पसार झाले. अपहरणाचा गु्न्हा संवेदनशील असून, आरोपींचा माग काढण्यात येत आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026