• Home
  • क्राईम
  • ‘फॉरेन टूर’ सांगून भामट्याने घातला लाखोचा गंडा, महिला विमानतळावरून माघारी
Image

‘फॉरेन टूर’ सांगून भामट्याने घातला लाखोचा गंडा, महिला विमानतळावरून माघारी

प्रतिनिधी

सहलीला जाण्याची सर्वांनाच ओढ असते. त्यात विदेशात जाण्याची संधी मिळत असेल तर मग आनंदाला उधाण येणारच. या पार्श्वभूमीवर असंख्य ट्रॅव्हल्स कंपन्या स्थापन झाल्या आहेत. तसेच काही टूर आयोजित करणारे व्यवसायिकही आहेत. त्यातच डमी दलालही कार्यरत झाले असून फसवणुकीचे प्रकार ते करीत असल्याचे यापूर्वी अनेकदा उघडकीस आले आहे.

अशाच एकाने वर्धेकर महिलांची फसवणूक केल्याची बाब उजेडात आली आहे. स्थानिक महादेवपुरा येथे ममता मनोज देशमुख या गृहिणी राहतात.त्यांच्या शेजारी असलेल्या रेखा अडसूले व त्यांच्या एक आप्त या सहा जानेवारीस थायलंड ट्रिपवर जाणार होत्या. ही बाब त्यांनी ममता देशमुख यांना सांगितली. तेव्हा त्या पण येण्यास तयार झाल्या. टूर आयोजित करणारा ठाणे येथील आशीष ठवळे याच्याशी फोनवरून बोलणे झाले. ही माहिती त्यांनी सहकारी महिलांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली. सहा दिवसाचा टूर असून जाणे येणे, निवास व भ्रमंती असा एकूण खर्च प्रत्येकी ६७ हजार ८०० रुपये पडणार असल्याचे सांगण्यात आले. ते मान्य झाल्यावर ममता देशमुख यांनी ठवळे यास फोन पे द्वारे १५ ऑक्टोबर २०२२ रोजी २५ हजार, ४ नोव्हेंबर २०२२ रोजी २० हजार ८०० तसेच ८ डिसेंबर २०२२ रोजी वीस हजार रुपये पाठविले. त्यानंतर विदेशी चलणासाठी परत १५ हजार ३०० रुपये पाठविले.

यानंतर त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील कृष्णा हाडके, माला हाडके, अनिता झाडे, अनुश्री झाडे, रमेश हिवसे, वर्षा हिवसे, नीलिमा खंडार, वैशाली अडसूळ, रेखा अडसूळ, अंजली शेरजे, वंदना देशमुख, प्रिया कांबळे, अभिषेक कांबळे या सर्वांनी प्रत्येकी ६७ हजार ८०० रुपये ठवळे यास पाठविले. तसेच अतिरिक्त खर्चचे मिळून एकूण १० लाख २२ हजार ७०० रुपये ठवळे याने घेतले. मात्र प्रवासाची बनावट विमान तिकिटे पाठवून दिली. टूरची पूर्ण तयारी करीत हे सर्व आनंदात ठरल्या दिवशी मुंबई विमानतळावर पोहचले. एजेंट ठवळे याची वाट बघू लागले. मात्र तो आलाच नाही. तेव्हा महिलांनी त्याच्या घरी जाऊन शोध घेतला. पण तिथेही तो आढळून आला नाही. पुढे पैसेही परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी शहर पोलीसांकडे तक्रार केली. तसेच सायबर पोलिसांनीही गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026