• Home
  • क्राईम
  • शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्याचा वाहन चालक लाच प्रकरणात ताब्यात
Image

शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्याचा वाहन चालक लाच प्रकरणात ताब्यात

प्रतिनिधी

वाळूचे जप्त केलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली परत करण्यासाठी लागणारा उपविभागीय अधिकारी यांचा लेखी आदेश देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने वाहन चालकासह खासगी व्यक्तीला ताब्यात घेतले.

शिरपूर उपविभागीय अधिकारी यांच्या वाहनावरील चालक मुकेश विसपुते (३५. रा. विमल नगर, शिरपूर) आणि बॉबी उर्फ प्रशांत सनेर ( ५०, रा. शाहू नगर, देवपूर, धुळे) अशी लाच मागणाऱ्या दोघांची नावे आहेत. यापैकी बॉबी हा खासगी व्यक्ती आहे. तक्रारदारांचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली असून ते या वाहनांतून वाळू या गौण खनिजची वाहतूक करताना आढळले होते. त्यामुळे महसूल विभागातर्फे झालेल्या कारवाईत ही वाहने जप्त करण्यात आली होती. जप्त केलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली तक्रारदार यांना परत देण्यासाठी शिरपूर उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीच्या लेखी आदेशाची गरज असल्याने हा आदेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात खासगी व्यक्ती बॉबी उर्फ प्रशांत सनेर याने वाहन चालक मुकेश विसपुते यांच्या मार्फत २० हजार रुपये लाचेची मागणी केली. हा प्रकार २६ डिसेंबर २०२३ रोजी घडला होता.

तक्रारदार यांनी या प्रकरणी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या चौकशी व खात्री केल्यावर यात तथ्य आढळून आल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरपूर येथे सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026