• Home
  • क्राईम
  • आरोग्य केंद्राच्या शिपायाचा पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पीडितेची उपचाराअभावी हेळसांड
Image

आरोग्य केंद्राच्या शिपायाचा पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पीडितेची उपचाराअभावी हेळसांड

प्रतिनिधी

घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. ९ मार्चला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पीडित मुलगी स्वतःच्या घरासमोर खेळत होती. शेजारी आरोग्य कर्मचाऱ्यांची शासकीय निवासी वसाहत आहे. संतोष कोंडेकर हा तिथे एकटाच राहतो. त्याने मुलीला जवळ बोलावले व घरात नेऊन तिच्याशी कुकर्म केले. हा प्रकार एका मुलीने पाहिला व घरी जाऊन सांगितला. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले, पण तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे उपचारासाठी मुलीला घेऊन ते रात्री जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पोहोचले.

मुलीला १० मार्चला सकाळी अधिक उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. पीडितेच्या आईच्या जबाबावरून गडचिरोली ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी प्रकरण एटापल्ली तालुक्यातील संबंधित पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, ही घटना अतिशय दुर्दैवी असून सविस्तर अहवाल मागविण्यात येईल. वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचारात हलगर्जी झाली असेल तर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी सांगितले.

या घटनेनंतर आरोपी संतोष कोंडेकर फरार झाला आहे. सुरूवातीला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करणारा संतोष दोन वर्षांपासून एटापल्ली तालुक्यातील आरोग्य केंद्रात शिपाई पदावर नियुक्त आहे. त्याचा शोध सुरु असल्याचे पेंढरीचे उपअधीक्षक जगदीश पांडे यांनी सांगितले.

Releated Posts

रांजणगाव MIDC मध्ये देहव्यापारावर धाड; सात महिलांची सुटका, दोन अटकेत

प्रतिनिधी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

जुन्नर तालुक्यात दुहेरी हत्याकांड, रात्रीत होत्याच नव्हत झालं..

प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीत बगाडवाडी येथे तळेरान गावच्या शिवेवर राहत असलेल्या मुकने कुटुंबात अत्यंत…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैद्य दारू विक्रेत्यांची धरपकड. हे उशिरा सुचलेले शहाणपण? यामुळे नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चा.

संपादक – मधुकर बनसोडे. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामधील हडपसर येथे भेसळयुक्त दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या…

ByBymnewsmarathi Jun 2, 2026

हुंड्याच्या छळातून १८ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी पुण्यातील कोथरूड परिसरात हुंड्यासाठी छळ करून १८ वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला…

ByBymnewsmarathi May 12, 2026