• Home
  • क्राईम
  • शाळेतील शिक्षिकांकडून मारहाण अन् नववीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन
Image

शाळेतील शिक्षिकांकडून मारहाण अन् नववीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

प्रतिनिधी

अकोला शहरातील नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला. शिक्षिकांकडून मारहाण आणि मानसिक जाचाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.शहरातील खदान परिसरातील रहिवासी अल्तमेश हा एका विद्यालयात नववीमध्ये शिक्षण घेत होता. काल शाळेत झालेल्या किरकोळ कारणांवरून अल्तमेशला शाळेतील शिक्षिकांनी बेदम मारहाण केली. त्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप पालकांनी केला.

घडलेल्या प्रकार अल्तमेशने घरी आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर सायंकाळी राहत्या घरातील वरच्या खोलीमध्ये तो अभ्यासासाठी गेला. रात्री बराच वेळ तो खाली न आल्याने आई त्याच्याकडे गेली. त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. खदान पोलिसांनी आत्महत्या प्रकरणाची नोंद केली आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या जाणार असल्याचे खदान पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Releated Posts

सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByBymnewsmarathi Jan 22, 2026

बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला!!

प्रतिनिधी बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत राज्य कर निरीक्षक सचिन नारायण जाधवर (वय ३५)…

ByBymnewsmarathi Jan 18, 2026

कोंढव्यात पती-पत्नीचा राहत्या घरी मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथील श्रद्धानगर परिसरात एका ५२ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ४८ वर्षीय पत्नीचा त्यांच्या राहत्या घरी…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

पेट्रोलिंगमध्येच उघडकीस आली मोटारसायकल चोरीची टोळी, सराईत चोर पोलिसांच्या ताब्यात वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

 प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत निंबूत बारामती रोडवर निंबूत गावचे हद्दीत निंबुत छप्री कॅनॉल येथे पेट्रोलिंग दरम्यान…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026