• Home
  • इतर
  • सोमेश्वरचा पहिला हप्ता २८०० रुपये.
Image

सोमेश्वरचा पहिला हप्ता २८०० रुपये.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाकरीता कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रति मे.टन २८०० /- रुपये प्रमाणे पहिला हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.श्री.जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर २,८१,३०७ मे. टनाचे गाळप केले असुन सरासरी १०.६२ टक्के साखर उतारा राखीत २,९४,५५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दि. १५/११ अखेर पर्यंत गाळ्पास आलेल्या सुमारे १,५९,७६० मे. टन ऊसाचे प्रती मेट्रीक टन २८०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता ५ डिसेंबरपर्यंत वर्ग करणार असल्याचे श्री.जगताप यांनी सांगितले.श्री. जगताप पुढे म्हणाले की, आपल्या कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन आजअखेर २ कोटी ८२ लाख ५ हजार २७३ युनिट्स वीजनिर्मिती केली असुन १ कोटी १९ लाख ६८ हजार ४२५ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून १६ लाख ६८ हजार ३४९ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असुन सोबत ४ लाख ५० हजार ३४३ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. श्री. जगताप पुढे म्हणाले की, गतवर्षीप्रमाणे याही हंगामात आपला कारखाना सुरळीतपणे व यशस्वी पार पडण्यांसाठी आपणा सर्व सभासद शेतकरी, ऊसतोड वाहतुकदार-मजुर, कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल असा मला विश्वास आहे. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक उपस्थित होते.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025