• Home
  • इतर
  • गुजरात मधून आणलेले सिंह उद्या सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडणार
Image

गुजरात मधून आणलेले सिंह उद्या सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडणार

मुंबई: गुजरात मधून आणलेली सिंहांची जोडी उद्या मंगळवारी सहा डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोडण्यात येणार आहेत. ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला होता. आता त्यांना मुंबईतील वातावरणाची पुरेशी सवय झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात त्यांना सोडण्यात येणार आहे. हे सिंह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्याने येथील बंद पडलेली सिंह सफारी पुन्हा सुरू होणार आहे. ही सिंहांची जोडी अवघ्या दोन वर्षांची असल्याने पुढील अनेक वर्षे सिंह सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येईल तसेच या सिंहांच्या पुढच्या पिढ्याही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निर्माण होतील असा विश्वास ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. भारतीय स्टेट बँकेने हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेतले आहेत. ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेण्याची सूचना बँकेला केली होती. ती तातडीने बँकेने स्वीकारल्या बद्दल वनमंत्र्यांनी बँकेचे कौतुक करत आभार मानले आहेत.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025