• Home
  • क्राईम
  • पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने तरुणावर कोयत्याने वार; कोंढव्यातील घटना
Image

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने तरुणावर कोयत्याने वार; कोंढव्यातील घटना

प्रतिनिधी

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. टोळक्याने कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी तिघांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

महंमद प्यारे शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अरबाज उर्फ लॅब याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेख याने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरबाज याच्या साथीदाराचे घर पोलिसांना दाखविल्याचा संशय आरोपींना होता. आरोपी शेखवर चिडले होते. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेख कोंढव्यातील कोणार्क पुरम सोसायटीच्या परिसरातून निघाला होता. तेथील रिक्षा थांब्याजवळ आरोपी अरबाज आणि साथीदारांनी त्याला अडवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तू तबरेजचे घर पोलिसांना का दाखविले?,’ अशी विचारणा करून आरोपींनी शेखवर कोयत्याने वार केले. शेख याच्या डोक्यावर वार केल्याने तो जखमी झाला. त्यावेळी रिक्षा थांब्याजवळ असलेल्या नागरिकांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना धमकावले. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.

Releated Posts

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026