प्रतिनिधी
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, विद्या समिती पुणे व बारामती तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, बारामती तालुका यांच्यावतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धा बुधवार दि.७/१२/२०२२ रोजी मिशन हायस्कूल बारामती या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील बहुतांश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण शारदाबाई पवार विद्यालय शारदानगर येथील मा.सौ. दीक्षित मॅडम यांनी व मिशन हायस्कूल बारामतीचे मा. श्री. खारतोडे सर यांनी केले. या स्पर्धेत श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढील गटात यश संपादन केले…
*लहान गट* इ.५ वी ते ७ वी
*द्वितीय क्रमांक – कु.बनसोडे ऋतुजा मधुकर* (इ.७वी)विषय -पितृ देवोभव..
*मोठा गट*
इ.८वी ते १० वी*प्रथम क्रमांक – केंजळे वेदांत चंद्रकांत*(इ.९वी)विषय -माझा आवडता क्रांतिकारक…
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सौ.दिपाली ननावरे, मराठी विषय शिक्षक श्री. भगत सर व श्री. खुडे सर यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैय्या काकडे दे., उपाध्यक्ष मा. श्री. भीमराव बनसोडे, मानद सचिव मा.श्री. मदनराव काकडे दे. यांनी केले.