• Home
  • क्राईम
  • अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार, येरवड्यातील घटना
Image

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार, येरवड्यातील घटना

प्रतिनिधी

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रितेश लक्ष्मण परदेशी (वय ४८, रा. जयजवाननगर, येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. परदेशी याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उमेश रमेश वाघमारे (वय ३८, रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आराेपी वाघमारे पसार झाला आहे. परदेशी यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी आणि वाघमारे ओळखीचे आहेत. परदेशी ठेकेदार आहेत. नात्यातील एका महिलेशी परदेशी यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी वाघमारेला होता. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीस्वार परदेशी हे येरवड्यातील जयजवाननगर परिसरातून निघाले होते.

त्यावेळी आरोपी वाघमारे तेथे आला. त्याने कुऱ्हाड लपविली होती. परदेशी यांना त्याने थांबविले. नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करुन त्याने परदेशी यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. प्रसंगावधान राखून त्यांनी कुऱ्हाडीचे वार हातावर झेलले. परदेशी यांच्या दोन्ही हातांना जखम झाली. दुचाकीवरुन तेे तोल जाऊन पडले. त्यानंतर आरोपीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांना या भागातील नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. आरोपी वाघमारे तेथून पसार झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

Releated Posts

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026