प्रतिनिधी –
बारामती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय टेनेक्वाईट स्पर्धेत आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले आहे.
बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी जिल्हास्तरीय टेनेक्वाईट स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातून अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. सोमेश्वर विद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. १४ व १७ वर्षाखालील मुलांनी तृतीय तर १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने ही तृतीय क्रमांक मिळवला. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक एस टी जेधे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, सचिव भारत खोमणे, संचालक मंडळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालभाई शेख व आंबी बुद्रुक व आंबी खुर्दच्या ग्रामस्थांनी विद्यालयाचे अभिनंदन केले आहे. तर मोरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र तावरे यांनी यशस्वी खेळाडूंचा विशेष सत्कार केला.