• Home
  • क्राईम
  • लग्नाची वरात, पोलीस स्टेशनचे दारात
Image

लग्नाची वरात, पोलीस स्टेशनचे दारात

प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील माळेगांव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अंतर्गत येणारे मौजे माळेगांव खुर्द या गावात आज दिनांक 20/04/2025 रोजी सायं 04.00 वा.चे सुमारास भारतीय संसदेने भारत देशातील सर्व जाती धर्मातील पुरुषांकरिता कमीत कमी 21 वर्षे, आणि मुलींसाठी कमीत कमी 18 वर्षे वयोमर्यादा ठरवून दिलेली असताना देखील एका विशिष्ट समाजातील नातेवाईकांनी एकत्र येऊन नवरी मुलीचे वय 13 वर्ष 8 महिने असलेबाबत नवरी मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील माळेगांव खुर्द गावचे ग्रामपंचायत मालकीचे यशवंत सभागृह येथे ग्राम पंचायत कार्यालयास कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर लग्न लावून दिलेबाबतची माहिती गुप्त बातमीदार यांचे कडून माळेगांव पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन लोखंडे यांना मिळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथक सदर घटनास्थळी रवाना करून त्यांना मिळाले बातमीचे अनुषंगाने सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेमुळे पोलीस पथकाने मिळाले बातमीचे अनुषंगाने सत्यता पडताळून नवरी मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री केले नंतर एकंदरीत सदर घडलेली घटना ही बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असलेने संबंधित आरोपींना माळेगांव पोलीस ठाणे येथे चौकशी कामी आणण्यात आलेले होते.

       सदर घटनेच्या अनुषंगाने मौजे माळेगांव खुर्द या गावचे ग्रामपंचायत अधिकारी श्री.इम्तियाज राजमहंमद इनामदार यांनी शासनामार्फत फिर्याद दिल्याने माळेगाव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 97/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3 (5) सह बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 चे कलम 9, 10 प्रमाणे नवरी मुलीचे वडील

1) राजेश अजगर भोसले नवरीची आई 2) सौ.वारणा राजेश भोसले दोघेही रा.माळेगाव खुर्द ता.बारामती जि.पुणे

नवरदेव 3) राहुल भानुदास शिंदे, नवरदेवाचे वडील 4) भानुदास मायाजी शिंदे व नवरदेवाची आई 5) रुपाली भानुदास शिंदे अ.क्र.3 ते 5 सर्व रा. पिपरी ता खंडाळा जि सातारा यांचे विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

       सदरचा गुन्हा पो.हवा.1901 मोहोळे यांनी दाखल करून पुढील तपास पो.हवा. 2213 सय्यद यांचेकडे दिलेला आहे.

 *चौकट*

कोणताही कायदा मंजूर करण्यापूर्वी ते विधेयक तयार करण्यासाठी शासन त्याचे फायदे आणि तोटे हे खात्री केलेनंतर त्या नियमावली सर्व समाजाच्या दृष्टीने लागू करणे आवश्यक असल्यासच भारतीय संसद कोणताही कायदा मंजूर करून त्या नियमावली प्रमाणे कार्यवाही करण्याचे काम शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडे दिले जाते, त्या मुळे या सर्व बाबींचा विचार करून सर्व नागरिकांनी आपले वर्तन हे सर्व कायदेशीर नियमात राहील यासाठी प्रयत्न करावा, जेणे करून कोणत्याही कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार नाही. तसेच जो कोणीही कायदा मोडेल त्यांचेवर कडक कायदेशीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन माळेगांव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि श्री.सचिन लोखंडे यांनी केलेले आहे.

Releated Posts

सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByBymnewsmarathi Jan 22, 2026

बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला!!

प्रतिनिधी बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत राज्य कर निरीक्षक सचिन नारायण जाधवर (वय ३५)…

ByBymnewsmarathi Jan 18, 2026

कोंढव्यात पती-पत्नीचा राहत्या घरी मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथील श्रद्धानगर परिसरात एका ५२ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ४८ वर्षीय पत्नीचा त्यांच्या राहत्या घरी…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

पेट्रोलिंगमध्येच उघडकीस आली मोटारसायकल चोरीची टोळी, सराईत चोर पोलिसांच्या ताब्यात वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

 प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत निंबूत बारामती रोडवर निंबूत गावचे हद्दीत निंबुत छप्री कॅनॉल येथे पेट्रोलिंग दरम्यान…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026