बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीमध्ये दि. 17/12/2022 रोजी सायंकाळी 06/00 वा चे सुमारास एमआयडीसी बारामती मधील कोमल हॉटेल येथे व शौर्य मोबाईल शॉपी कल्याणी नगर तांदुळवाडी येथे हातामध्ये कोयते घेऊन दहशत निर्माण करून मारहाण करून मोबाईल ,दारू व रोख रक्कम – 8000 रुपये घेऊन गुन्हेगार पळून गेल्याने बारामती पोलीस स्टेशन येथे इसम नामे 1.अनिश रुपेश जाधव वय 20 वर्ष रा. प्रगती नगर ता. बारामती जिल्हा पुणे.2. पियुष मंगेश भोसले वय 19 वर्ष रा.आमराई ता.बारामती जि. पुणे.3 .शमुवेल उर्फ गोट्या सुरेश जाधव वय 20 वर्षे रा वसंतनगर बारामती जि पुणे.4. चेतन पोपट कांबळे वय 20 रा वडार हाउसिंग सोसायटी आमराई बारामती ता बारामती जि पुणे .5.विशाल अनिल माने वय 19 वर्षे रा वडार हाउसिंग सोसायटी आमदाई बारामती ता बारामती जि पुणे व इतर यांचे वर बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर .677/22 व 678/22. भारतीय दंड विधान संहिता कलम 395, 397, 324 ,427 ,504 ,506 शस्त्र अधिनियम 4 /25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 या विविध कायद्यान्वये व कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले . बारामती सारख्या शांत शहरांमध्ये अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडली होती. त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे बारामती पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक दराडे, संतोष मखरे व तुषार लोंढे. यांना लवकरात लवकर आरोपी पकडण्याबाबत योग्य मार्गदर्शन व सूचना देऊन रवाना केले. त्या अनुषंगाने बारामती तालुका पोलीस यांचे तपास पथक आरोपींच्या मागावर होते आथक परिश्रम व वेगवेगळ्या युक्तांचा वापर करून शेवटी तालुका पोलीस यांचे तपास पथक गुन्हेगारांपर्यंत पोहोचलेच. शिरवळ ,खंडाळा जिल्हा सातारा येथे सदर गुन्हेगार लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या ठिकाणी त्यांचा कसून शोध घेण्यात आला. तपास पथकातील पोलिस अंमलदार राम कानगुडे यांना सदर गुन्हेगार पाटस – बारामती रोड वरून येत असल्याबाबत ची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेण्यासाठी बऱ्हाणपूर तालुका बारामती येथे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. परंतु सदरची कोयता गॅंग यांना या बाबीचा सुगावा लागताच त्यांनी बराणपुर येथे येताच त्यांची मोटरसायकलस सोडून उसाच्या व ज्वारीच्या शेतामध्ये धूम ठोकली सुमारे दोन तास सदर आरोपींचा पायी पाठलाग करून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आरोपींना पथकातील पोलिसांनी आरोपींच्या मागे पळून पाठलाग करून ताणून पकडलेच . हातामध्ये कोयते दाखवून हॉटेलमध्ये लोकांना मारहाण तसेच पार्किंग मध्ये वाहनांची तोडफोड करणे अशी घटना बारामतीत पहिल्यांदाच घडली होती. व *असे कृत्य एक नाही तर बारामती शहरात एकाच दिवशी तीन ठिकाणी घडले होते.* त्यामुळे बारामती मधील लोक हादरले होते . परंतु तालुका पोलीस स्टेशन येथील तपास पथकाने सदर आरोपींना दोनच दिवसात शोधून काढून बेड्या ठोकल्यामुळे आता कोयता गॅंग मुळे तयार झालेले भीतीचे वातावरण संपलेले आहे.सदरची कामगिरी मा. श्री अंकित गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण, मा.श्री आनंद भुईटे सो अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि योगेश लंगुटे, पो. हवा. राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे , दीपक दराडे व तुषार लोंढे यांनी केली आहे. गुनहयाचा पुढील अधिक तपास स .पो .नि. श्री राहुल घुगे व पोलीस उपनिरीक्षक श्री लेंडवे हे करीत असून या आरोपींनी यासारखे आणखी गुन्हे केले आहेत का याबाबत सखोल तपास ते करीत आहेत.