परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील इंजेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नुकतेच सरपंचपदी विराजमान झालेले सौ. विद्या अमोल कराड यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली.यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शाळेत भेट देऊन सौ. विद्या अमोल कराड यांनी शाळेतील अडीअडचणी समजून घेतल्या.समस्या जाणून घेतल्या.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला.शाळेतील समस्या कोणतीही असो ती तर सोडवणारच गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असे सांगून पिण्याच्या पाण्यासाठी एक महिन्याच्या आत बोअर घेऊन फिल्टर बसविण्यात येणार असल्याचेही सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांनी सांगितले.
*बचत गटांचे प्रश्न प्रधान्याने सोडवू – सरपंच सौ.विद्या अमोल कराड*
तालुक्यातील इंजेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नुकतेच सरपंचपदी विराजमान झालेले सौ. विद्या अमोल कराड यांनी आज गुरुवार दि.22 डिसेंबर पासून कामाला सुरुवात केली. गावातील सर्व महिला बचत गटांना भेट दिली असता त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच बचत गटांच्या कोणताही प्रश्न असो किंवा अडचणी सोडवू तसेच त्याचे प्रशन ही जाणून घेतल्या बचत गटाच्या ग्राम संघाच्या ऑफिसला 15 दिवसाच्या आता लाईट फिटिंग व दरवाजे खिडक्यांची दुरुस्ती व विविध प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी कटीबधद असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ.विद्या अमोल कराड यांनी सांगितले.