प्रतिनिधी
राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने, सौ, उमाताई वहाडणे जनसंपर्क अधिकारी कोपरगाव यांच्या नेतृत्वाखाली मानव विकास संरक्षण समितीच्या वतीने व माझा गाव माझा अभिमान ग्रुपच्यासंयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यात भव्य महिला रोजगार मेळावा घेण्यात आला होता, दि, २०। १२। २०२२ रोजी *महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी* *श्री शिंदे भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली*

या महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, अनेक मान्यवर उद्योजक यावेळी उपस्थित होते, डॉ, लुनेश्वर भालेराव सर व डॉ, नितिनजी शिंदे सर, यांना डॉक्टरेट पदवी मिळाली म्हाणून याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच समाजसेविका माधुरीताई उदावंत यांना इंटरनॅशनल संविधान संसद असोसिएशन हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच, समाजसेवक व प्रसिद्ध उद्योजक म्हणून सुधीर भाऊ मैड याचाही सत्कार करण्यात आला,

मानव विकास संरक्षण समितीच्या कोपरगाव तालुका जनसंपर्क अधिकारी सौ, उमाताई वहाडणे यांनी याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन केले, महिलांना स्वताच्या पायावर उभे करायचे आहे व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचे आहे या उद्देशाने हा मेळावा घेण्यात आला, *समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी कुराडे सर* यांच्या विचारातून समितीला नविन दिशा देण्यासाठी असे विधायक उपक्रम जिथे समितीचे काम योग्य प्रकारे चालू आहे आशा भागात घेण्यासाठी समिती प्रयत्न करत आहे,

जास्तीत जास्त महिलांना स्वयं रोजगार मिळाला पाहिजे,व कुटुंब सक्षम झाले पाहिजे म्हणून हे अभियान सुरू करण्यात आले आहे, म्हणून महाराष्ट्रातील समाजसेवी वृत्तीच्या लोकांनी समितीच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समितीच्या कामात सहभाग घ्यावा, असे आवाहन समितीचे महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी बी, व्ही, शिंदे यांनी केले आहे,