• Home
  • इतर
  • जोडे मारून खासदार राहुल शेवाळे यांचा जन्मगावी निषेध
Image

जोडे मारून खासदार राहुल शेवाळे यांचा जन्मगावी निषेध

प्रतिनिधी

इंदापूर- शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांचे जन्मगाव असणाऱ्या इंदापूर शहरांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल शेवाळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून केलेल्या बेताल वक्तव्याबाबत व अशोभनीय कृत्याबाबत निषेध केला

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय काळे बोलत होते ते म्हणाले की पाठीमागील काळामध्ये सुशांत रजपूत व दिशा यांच्या झालेल्या आत्महत्येचा विषय जाणीवपूर्वक ऐनवेळी उकरून काढून ठाकरे कुटुंबियांवरती विनाकारण कसलाही संबंध नसताना व त्या काळामध्ये त्यांच्या झालेल्या आत्महत्या वरती चौकशी नेमलेल्या सर्व खात्यांनी ती आत्महत्याच असून हत्या नाही हे चौकशीत निष्पन्न असताना देखील जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये यांच्या वरती होणारे आरोप व मिंदे सरकार मधील इतर मंत्रीही करत असलेल्या भ्रष्टाचार जनतेचे होणारे हाल हिवाळी अधिवेशनामध्ये उघडे पडू नये आणि अशा थोतांड चर्चेमध्येच ते सगळे झाकून जावेत जनतेचे सगळे लक्ष यांच्याकडेच खेचले जावे याकरता अशा अनेक शेवाळे ना अशा वेगवेगळ्या प्रकारचे काम दिले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांचे अपमान महाराष्ट्रातील सीमा लगतच्या प्रश्नांवरती जाणीवपूर्वक अभद्र भाषा व इतर अनेक अशा नको त्या विषयावरती लोकांना गुंतवून त्यांच्याकडून झालेल्या चुकांवरती पांघरून टाकण्याचे काम या मिंदे गटातील मंत्री लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदाराकडून होत असून खऱ्या अर्थाने त्यांचा निषेध करण्याकरताच आज या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले परंतु यापुढे माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या विषयी जर अपशब्द काढला तर महाराष्ट्रातील शिवसैनिक गप्प बसणार नाही ज्यावेळी आपण दुसऱ्याच्या घरावरती दगड मारण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपले घर काचेचे आहे हे या विनाकारण टीका करणाऱ्यांनी विसरू नये ज्यावेळी ते विनाकारण ठाकरे कुटुंबीयावरती गरळ गळतात त्याचवेळी महाराष्ट्रातील शिवसैनिक असतील इतर मीडियाचे काही प्रतिनिधी असतील यांच्यामार्फत खासदार राहुल शेवाळे यांचे काही अशोभनीय वागून व बाहेर देशी जाऊन केलेले गलिच्छ प्रकार आपण मीडिया आणि मोबाईल वरती पाहत आहोत अशा लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर राजीनामा देऊन त्यांना हवे ते धंदे करत बसावेत व शिवसेनेच्या नादी लागू नये अशा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला यावेळी अँड नितीन कदम माजी तालुकाप्रमुख तसेच दीपक खरात क्षेत्र प्रमुख यांनी आपल्या शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय काळे, तालुका क्षेत्र प्रमुख दीपक खरात, माजी तालुकाप्रमुख नितीन , युवा सेना जिल्हा सरचिटणीस सुरज , जिल्हा समन्वयक राहुल , युवा सेना तालुका युवा अधिकारी सचिन , युवा सेना तालुका समन्वयक नवनाथ , उपतालुकाप्रमुख फिरोज , विभाग प्रमुख दत्ता खुडे , विभाग प्रमुख डॉक्टर बाळासाहेब भोसले, उपविभाग प्रमुख अमित बामणे, उपविभाग प्रमुख दत्ता कदम, युवा सेना विभाग प्रमुख सागर कदम व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025