• Home
  • माझा जिल्हा
  • जुनी मोटारसायकल- वाहने खरेदी विक्री करत असताना सावधानता बाळगणे बाबत
Image

जुनी मोटारसायकल- वाहने खरेदी विक्री करत असताना सावधानता बाळगणे बाबत

प्रतिनिधी

संपूर्ण पुणे ग्रामिण जिल्ह्यात नगरपालिका, ग्रामपंचायत, कॅन्टोन्मेंट बोर्ड इ. हद्दीमध्ये जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक तसेच वाहन दुरुस्ती दुकान/गॅरेज मधून वाहन खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत फरासखाना पोलिस स्टेशन परिसरात बॉम्बस्फोट मध्ये सातारा जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकल चा वापर करण्यात आलेला होता व अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सुद्धा चोरीच्या मोटारसायकलींचा सर्रास वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच याचप्रमाणे अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांकडून चोरीचा मोटारसायकली व इतर लहान मोठ्या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे त्या अनुषंगाने जुन्या मोटारसायकली व वाहने यांची खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असून याबाबत खरेदी-विक्रीचा योग्य तो तपशील ठेवला जात नसल्याने गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनांची खरेदी विक्री होण्याची दाट शक्यता आहे म्हणून वाहन खरेदी विक्री बाबत योग्य तपशील उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम गुन्हे उघडकीस येणे वर होत आहे यामुळे जुनी वाहने खरेदी विक्री बाबत ची माहिती संबंधित पोलिस स्टेशनला असणे आवश्यक आहे, याकरिता

*मा. जिल्हाधिकारी सो पुणे यांनी त्यांचे कार्यालयाकडील जा.क्र -पगक/कावि/६६७२/२०२२ दिनांक – २६/१२/२०२२ अन्वये संपूर्ण पुणे जिल्हा ग्रामीण भागात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यवसायिकांनी वाहन खरेदी विक्री संदर्भातील माहिती दर ७ दिवसांनी पोलीस स्टेशनला देणेबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला आहे.*

तरी माळेगाव पोलीस स्टेशन क्षेत्रांतर्गत जुन्या मोटारसायकली, वाहने यांची खरेदी विक्री करणारे व्यवसायिक, तसेच वाहने दुरुस्ती व्यवसाय करत असताना त्यांची गॅरेज मधूनच खरेदी विक्री करत असलेल्या व्यवसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी-विक्री होणाऱ्या वाहन बाबतची माहिती (वाहन क्रमांक इंजिन,चेसी क्रमांक, मूळ वाहनमालकाचे नाव मुळगाव तसेच सध्या राहत असलेला संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ओळखपत्र वाहनांचे आरसी, टीसी बुक तसेच खरेदी करणाऱ्याचे नाव, मुळगावचा व सध्या राहत असलेले ठिकाण संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक व ओळखपत्र इत्यादी माहिती वाहन विक्री झाले नंतर दर ७ दिवसांनी वाहन खरेदी विक्री केलेल्या सर्व वाहनांची माहिती माळेगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक श्री ज्ञानेश्वर सानप गोपनीय शाखा, माळेगाव पोलिस स्टेशन यांचे कडे सादर करावी.

*अन्यथा सदरची माहिती पोलीस स्टेशनला सादर न करता व्यवसाय करत असले बाबत निदर्शनास आलेस मा.जिल्हाधिकारी सो पुणे यांचे आदेशाचा अवमान केला म्हणून संबंधित दोषी व्यवसायिक यांचे विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. किरण अवचर सो यांनी दिलेली आहे.*

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026