• Home
  • इतर
  • काझीपेट पुणे एक्सप्रेस रोज चालविण्याची मागणी : सुधीर मुनगंटीवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
Image

काझीपेट पुणे एक्सप्रेस रोज चालविण्याची मागणी : सुधीर मुनगंटीवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

प्रतिनिधी

नागपूर :काझीपेट पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही सध्या साप्ताहिक तत्वावर धावणारी गाडी रोज चालवावी अशी मागणी आज चंद्रपूरचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना पुणे येथे जाण्याकरता केवळ काझीपेट पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही एकच थेट गाडी सध्या उपलब्ध आहे. ही गाडी आठवड्यात केवळ एकच दिवस धावत असल्याने इतर दिवशी पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. आजच्या काळात व्यापार उदिम आणि शिक्षणासाठी पुण्यात बरेच नागरिक जा ये करित असतात.

मात्र रोज रेल्वे उपलब्ध नसल्याने इतक्या दूरच्या अंतराचा प्रवास नाईलाजाने बसने करावा लागतो किंवा गाड्या बदलत प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर रोज धावणारी एक्सप्रेस गाडी असावी अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी बरीच वर्षे प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025