• Home
  • इतर
  • देवदहिफळ येथे श्री.खंडोबा मंदिरात खाडे कुटुंबियाकडून आकर्षक व मनमोहक पुष्पसजावट; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Image

देवदहिफळ येथे श्री.खंडोबा मंदिरात खाडे कुटुंबियाकडून आकर्षक व मनमोहक पुष्पसजावट; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

परळी वैजनाथ / धारूर (प्रतिनिधी) :-

येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, खोबरे आणि भंडाऱ्याची उधळण करत भाविकांच्या उपस्थितीमध्ये देवदहिफळ येथे ग्रामदैवत खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी आज रविवार दि.1 जानेवारी रोजी श्री खंडोबा मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली होती. श्री खंडोबा मंदिरात प्रदीप खाडे अध्यक्ष-कै.रामभाऊ अण्णा खाडे सेवाभावी संस्था लातूर, सहसचिव- नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ व खाडे कुटुंबीयांच्या वतीने आकर्षक व मनमोहक अशी फुलाची मनमोहक पुष्पसजावट करण्यात आली आहे.

चंपाषष्ठी पासून देवदहीफळ येथे खंडेरायाची यात्रोत्सव दीड महिना भरते. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात देवदहिफळ येथे भाविक उपस्थित राहतात. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत श्री खंडोबा मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण झाले आहे. नवीन वर्ष व यात्रोत्सव निमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.

श्री.खंडोबा मंदिर,देव दहिफळ येथे प्रदीप खाडे अध्यक्ष-कै.रामभाऊ अण्णा खाडे सेवाभावी संस्था लातूर, सहसचिव नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ व खाडे कुटुंबीयांच्या वतीने नवीन वर्षानिमित्त व यात्राउत्सव निमित्त महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदहिफळ येथील ग्रामदैवत श्री मल्हारी म्हाळसाकांत खंडोबाच्या संपूर्ण श्री.खंडोबा मंदिर व गाभाऱ्यात मंदिर विविध रंगबेरंगी फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर, गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे. खाडे कुटुंबियाच्या वतीने आज सकाळी श्री खंडोबा मंदिरात श्री खंडेरायाचे मनोभावे दर्शन घेऊन व विधिवत पूजन केले. मंदिर गाभारा व परिसरात झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, ब्लुडेझी यासह सुमारे विविध प्रकारातील फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिरात आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली असल्याचे प्रदीप खाडे यांनी सांगितले आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025