Uncategorized
सदोबाची वाडी येथे तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांच्या मार्गदर्शनाखाली केळी समूह माहिती मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी सदोबाचीवाडी येथे तालुका कृषी अधिकारी सचिन हाके सर यांचे मार्गदर्शनाखाली केळी समूह माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सदोबाचीवाडी येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे ऋषिकेश कदम यांनी AI Sugarcane विषयी माहिती दिली. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर भेट देऊन पीक किड व रोग सर्वेक्षण पाहणी केली. […]
श्री श्रेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे श्रावण मास यात्रा काळातील वाहन पार्किंग लिलाव सालाबाद प्रमाणे विक्रमी बोली 2,92,000 लावून संतोष हाके यांनी घेतला.
सोमेश्वर प्रतिनिधी. आज 11 वाजता सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तमदादा जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया संपन्न झाली. मगरवाङी गावचे उधोजक हनुमंतराव मगर व संतोष हाके या दोघांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. हनुमंतराव मगर यांनी 2,90,000 बोली लावली होती.संतोष हाके यांनी 2,92000 बोली लावून लिलाव घेतला. यावेळी संतोष […]
भारतीय पत्रकार संघ नेहमीच प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी : गणगे पाटील
दौंड प्रतिनिधी: भारतीय पत्रकार संघ नेहमीच प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे मत भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश गणगे पाटील यांनी व्यक्त केले. दौंड येथील पंचायत समितीच्या कार्यालयात भारतीय पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाची आढावा बैठक तसेच पद्ग्रहन सोहळ्यासह पत्रकारांसाठी कार्यशाळा देखील मोठ्या उत्साहात पार पडली.या बैठकीत पत्रकारांच्या […]
भटक्या श्वानांचा बंदोबस्त करा’ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नगर परिषदेला स्पष्ट सूचना; बारामतीतील विकासकामांची पाहणी
प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी रविवारी बारामती शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या संख्येबाबत नाराजी व्यक्त केली आणि नगर परिषदेला स्पष्ट शब्दांत सूचित केले की, “भटक्या श्वानांचा बंदोबस्त तातडीने करा, अन्यथा उपाययोजना करण्यात यावी.” अजित पवार यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसह सकाळी १० वाजल्यापासून विविध भागांतील सुरू […]
पुरंदर विमानतळ : ‘प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर भूखंड वाटप, जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुरंदर प्रतिनिधी. पुरंदर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासंदर्भात जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रभावित होणाऱ्या गावांतील नागरिकांना भूखंड वाटप करताना ‘प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य’ (First Come, First Serve) या तत्त्वावर प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यास अधिकृत मंजुरी देण्यात आली असून, संबंधित गावांमध्ये याबाबतची माहिती पोचविण्याचे काम […]
श्री बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मृतिदिन साजरा…
प्रतिनिधी. श्री बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय, निंबूत येथे दि.१८ जुलै २०२५ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मु.सा. काकडे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. मृणालिनी मोहिते मॅडम यांना आमंत्रित करण्यात आले होते.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्या व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांच्या हस्ते करण्यात झाले. […]
भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश.
प्रतिनिधी – पुणे ग्रामीण जिल्ह्यात घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरुंचे नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, भाडे करारनामा, ओळखपत्र आदींबाबतची कागदपत्रे स्थानिक पोलीस ठाण्याकडे सादर करावीत, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत. ग्रामीण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्याने तेथे काम करणाऱ्या लोकांना […]
कुरणेवाडी येथे पीक शेती शाळा संपन्न
बारामती, दि.18: कृषी विभागाच्यावतीने पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत (क्रॉपसॅप) कुरणेवाडी येथे तानाजी बाळकृष्ण पवार यांच्या शेतात मका पीक शेती शाळा आयोजित करण्यात आली. यावेळी वडगाव निंबाळकरचे उप कृषी अधिकारी प्रताप कदम, सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण गायकवाड तसेच परिसरातील शेतकरी तसेच महिला उपस्थित होते. श्री.कदम म्हणाले, दिशा कृषी उन्नतीची या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार […]
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक.
प्रतिनिधी पुणे दि. 18: सांस्कृतिक कार्य विभागाच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे अर्ज ऑनलाईनरित्या २० जुलै ते २० ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक […]
तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा मध्ये अजून दोन आरोपींवरती वडगाव निंबाळकर येथे गुन्हा दाखल.
प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे काही दिवसांपूर्वीच पोस्को व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये अजून दोन आरोपींचा समावेश झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ती एकटी रस्त्याने चालत जात असताना तिला जबरदस्तीने आरोपी सुजित जाधव राहणार रामनगर यांने त्यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये ओढून स्कॉर्पिओ गाडीच्या काळ्या रंगाच्या […]
