1 min read

बारामती ! होळ गावचा कारभार तरुण पिढीकडे सुपूर्त ; होळ गावच्या सरपंच पदी सूरज कांबळे यांची बिनविरोध निवड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील होळ गावच्या सरपंच पदी सुरज कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तरुण पिढीकडे गावच कारभार जावा व त्यांच्याकडून गावचा विकास व्हावा यासाठी सूरज कांबळे यांना सरपंच पद हे संभाजीनाना होळकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले . या पदासाठी आलेल्या निवडणूक प्रक्रियेत फक्त सुरज कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने […]

1 min read

जिथे उस तिथे बांधावर नारळ लागवड’ उपक्रमाचा वाणेवाडी येथे शुभारंभ

प्रतिनिधी. शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत-उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख बारामती, दि.२०: शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत “जिथे उस तिथे बांधावर नारळ लागवड” तसेच जलतारा योजनेच्या माध्यमातून नारळ लागवडीचा शुभारंभ ग्रामपंचायत वाणेवाडी येथे शुक्रवारी करण्यात आला. यावेळी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख यांच्या हस्ते […]

1 min read

बारामती! बारामतीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाला भव्य तोरण (कमान) उभारणीची मागणी.

 प्रतिनिधी – बारामती शहरातील विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारकाला प्रवेशद्वारावर त्यांच्या कार्य, विचार व वारशाचे प्रतीक ठरेल अशी सांची स्तूप शैलीतील भव्य सुवर्णकमान (तोरण) उभारण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन नगर परिषद बारामतीचे मुख्याधिकारी यांना अधीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्फत आज सादर करण्यात […]

1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सिंह दत्तक – सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टचा उपक्रम

प्रतिनिधी. पुणे : “सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि भारतही लवकरच जगाचा राजा होईल” या भावनेतून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. पुण्यातील कात्रज प्राणीसंग्रहालयातील सिंहांना सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्ट तर्फे दत्तक घेण्यात आले आहे. याअंतर्गत एक महिन्याचा खाणे, पिणे व औषधोपचाराचा संपूर्ण खर्च ट्रस्ट उचलणार आहे. ट्रस्टचे मार्गदर्शक […]

1 min read

बारामतीत राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा बैठक – तिरंगा चौकावर पदाधिकाऱ्यांचा मेळावा, नवरात्रीत “नवदुर्गा पुरस्कार वितरण” व पत्रकार सन्मान सोहळा

बारामती (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा बैठक रविवार, दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी बारामती येथे भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. 🚩 संस्थापक व प्रेरणास्थान श्री श्री 1008 दिगंबर खुशाल भारतीजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने व राष्ट्रीय अध्यक्ष महंत योगी रोहतासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात येत आहे. 👉 या बैठकीचे नेतृत्व […]

1 min read

मु.सा काकडे महाविद्यालयाला बारामती तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर. महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बारामती तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत मुसा काकडे महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे देशमुख,विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे […]

1 min read

सोमेश्वर साखर कारखान्यात तब्बल 54 लाखांचा घोटाळा; आरोपींवर गुन्हा दाखल न करण्यामागे राजकीय दबाव?

संपादक मधुकर बनसोडे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात तब्बल ₹54 लाख 29 हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा उघड झाला आहे. चार्टर्ड अकाउंटंटच्या तपासणीत गैरव्यवहार स्पष्ट झाल्यानंतरही आजवर आरोपींवर गुन्हा दाखल न झाल्याने सभासद व ऊस उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींवर कोणतीच कारवाई नाही ! या प्रकरणात तत्कालीन लेबर ऑफिसर दीपक निंबाळकर व कर्मचारी रूपचंद […]

1 min read

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये 54, लाख 29 हजाराच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल होणार का.

संपादक मधुकर बनसोडे. मागील काही महिन्यांपूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये जवळपास 54 लाख 29 हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन लेबर ऑफिसर दीपक निंबाळकर व रूपचंद साळुंखे या कर्मचाऱ्यांना कारखाना प्रशासनाने निलंबित केले. तर काही कर्मचारी जे निर्दोष होते त्यांना पुन्हा कामावरती घेण्यात आले कारखाना प्रशासनाकडून साखर आयुक्तांच्या पॅनल वरील मेहता आणि […]

1 min read

मु.सा. काकडे महाविद्यालयास शालेय कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद.

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, येथील प्रांगनाथ संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी […]

1 min read

बारामती ! ईद मिलादुन्नबी निमित्त लोकहित प्रतिष्ठान तर्फे बारामती येथे भव्य कव्वाली कार्यक्रम.

प्रतिनिधी – ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने बारामती येथे मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी लोकहित प्रतिष्ठान तर्फे भिगवन चौक येथे मशहूर कव्वाल हाजी सुलतान नाझा यांच्या कव्वालीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी नेत्रदीपक स्टेज सजवण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर (बा.न.प.) व बारामती नगरीचे मा. नगराध्यक्ष सुभाषशेठ सोमाणी […]