Home

1 min read

घाटकोपरमध्ये बंदुक विकण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक

प्रतिनिधी उत्तर प्रदेशमधून मुंबईत शस्त्रास्त्र विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेने घाटकोपर येथे अटक केली. पोलिसांनी या आरोपीकडून एक बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एक व्यक्ती शस्त्रास्त्र विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ६ च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी मंगळवारी […]

1 min read

सासऱ्यासाठी जावईच काळ, नंदुरबार जिल्ह्यातील बस वाहकाच्या हत्येची उकल

प्रतिनिधी शहादा येथील राज्य परिवहन महामडंळातील वाहक राजेंद्र मराठे यांच्या हत्येची उकल करण्यात नंदुरबार पोलिसांना यश आले असून कौटुंबिक वादातून जावयानेच सासऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. सुमारे तीन लाख रुपयांची सुपारी हत्येसाठी देण्यात आली होती. या प्रकरणी जावयासह सहा मारेकऱ्यांना शहादा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कांदिवली येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. […]

1 min read

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमजवळ वाघाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह

प्रतिनिधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जामठ्याच्या मैदानाजवळ चक्क वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. मृत्यू तब्बल १५ दिवसांपूर्वीचा असून वाघाच्या कवटीला मार आहे. तर वाघाची दोन नखेही गायब आहेत. तरीही वनखात्याने घटनेचा पीओआर फाडला नाही. केवळ अवशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून देण्यात आले. चौकशीचा ससेमिरा टाळण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा […]

1 min read

कात्रजमध्ये क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार

प्रतिनिधी क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर भागात बुधवारी सायंकाळी घडली. गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. मात्र, त्यानंतर दोन गटांत झालेल्या हाणामारीमध्ये दोन तरुणांवर शस्त्राने वार करण्यात आले. संतोषनगर भागातील घुंगुरवाला चाळ परिसरात तरुण बुधवारी सायंकाळी क्रिकेट खेळत होती. त्या वेळी तरुणांच्या दोन गटांत वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्या […]

1 min read

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

· भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर मधील कृषी विभाग कार्यालयामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात .?

प्रतिनिधी – फिरोज भालदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यातील सर्व सरकारी कामकाजाच्या इमारती उत्तम प्रकारे बांधल्या जात आहेत मात्र वडगाव निंबाळकर येथील कृषी विभाग मंडल कृषी अधिकारी कार्यालय ह्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का ? वडगाव निंबाळकर येथील कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्याने तेथील अधिकारी ,कर्मचारी व त्या कार्यालयात येणारे शेतकरी यांना […]

1 min read

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या सोशल मीडिया संघटनेच्या बारामती तालुका उपाध्यक्षपदी प्रदीप मांगडे यांची निवड

संपादक मधुकर बनसोडे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांच्या मान्यतेने वागळवाडी येथील होतकरू युवक प्रदीप भगवान मांगडे ( दादू ) यांची बारामती तालुका सोशल मीडिया संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आज करंजेपुल येथे युगेंद्र पवार यांच्या हस्ते दादू मांगडे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या निवडीमुळे परिसरातील युवकांमधून मांगडे यांच्या वरती […]

1 min read

सार्वजनिक ठिकाणच्या राजकीय जाहिराती तात्काळ काढून टाकण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश* *आचारसंहिता भंग झाल्याचे आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करावेत*

प्रतिनिधी. पुणे, दि. २०: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी; आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली असून […]

1 min read

बारामती..ग्रामपंचायत सदस्य च,होऊ लागले सब ठेकेदार.?निकृष्ट कामांच्या दर्जात वाढ बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज.

संपादक मधुकर बनसोडे. सध्या बारामती तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायत सदस्य सब ठेकेदाराच्या भूमिकेत दिसून येत आहेत. गावच्या विकासासाठी जनतेच्या हाता पाया पडून मत मागणारे उमेदवार सदस्य होताच स्वतःचा विकास करून घेण्यासाठी ठेकेदाराच्या भूमिकेत दिसत आहेत बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये विकास कामे सुरू आहेत मात्र टेंडर एकाच्या नावाने असते आणि काम करणारा ग्रामपंचायत सदस्य सब ठेकेदार […]

1 min read

निवडणूक लागली, शस्त्रे शासनाकडे जमा करण्याची वेळ झाली!

प्रतिनिधी लोकसभा निवडणूकनिमित्त जिल्ह्यातील परवानाधारक अग्नीशस्त्रे प्रशासनाकडे जमा करून घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्याचा एक भाग म्हणून या कार्यवाहिकडे पाहिले जाते. आचारसंहिता लागता क्षणी ही कारवाई सुरू करण्याचे निर्देश आहे. गृह विभागाचे परिपत्रक, यासंदर्भातील ४१७१/२०१४ ही विजय पाटील व शीतल पाटील विरुद्ध सरकार ही जनहित याचिका( रिट पिटीशन) , उच्च न्यायालयाचा […]