Home
डॉ. भीमराव आंबेडकर समानतेचा पाया कसे बनले, भारतीय समाजावर त्यांच्या योगदानाचा प्रभाव
प्रतिनिधी. डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन भारतीय संविधान, दलित उत्थान आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून स्मरणात ठेवले जाते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, दलितांचे हक्क सुनिश्चित केले आणि संविधानात समानता आणि न्यायाचा प्रवाह स्थापित केला. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे जीवन भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एक अद्वितीय अध्याय आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी महू, […]
स्थानिक स्वराज्य निवडणुका – मतदान सुरू, मतमोजणी तारीख अद्याप निश्चित नाही
प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानाचा पहिला टप्पा २ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाला. विविध नगरपरिषद-नगरपंचायतींमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवला असून मतदान केंद्रांवर गर्दी पहायला मिळाली. मात्र काही ठिकाणी उमेदवारांच्या अर्जांशी संबंधित आक्षेप, अपील आणि कायदेशीर तक्रारींमुळे मतदानाचा टप्पा काहीसा उशिराने चालत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रशासनात मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा विचार सुरू […]
नियम पाळणाऱ्यांवर दरवाजे बंद, नियम तोडणाऱ्यांना लाल गालिचा का?, आयोगाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात का?
संपादक- मधुकर बनसोडे सध्य संपूर्ण महाराष्ट्र मध्ये स्थानिक स्वराज्य निवडणूक चालू आहे, काही नगरपालिका आणि नगरपरिषद वगळता काल रात्री 10 पासून म्हणजे दिनांक 1 डिसेंबर 2025 रात्री 10 पासून मौन कालावधी लागू झाला. मौन कालावधी हा कायद्याने संरक्षित असा महत्त्वाचा टप्पा असतानाही, डिजिटल माध्यमांवर सुरू असलेल्या उघड प्रचारामुळे संपूर्ण प्रक्रियेची शुचिता धोक्यात आली आहे. निवडणूक […]
पाचट कुट्टी व्यवस्थापन कार्यशाळेचे वानेवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजन.
प्रतिनिधी. बारामती येथे ऊस पाचट व्यवस्थापन मोहिमे अंतर्गत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. बारामती तालुक्याच्या बागायत क्षेत्रामधील वडगाव नि. कार्यक्षेत्रामद्धे जवळपास 2500 हे. गळापायोग्य क्षेत्र असून कारखाने चालू झाले आहेत. बहुतांश शेतकरी ऊस पाचट व्यवस्थापन करत आहेत. कृषि विभागाने मागील 3-4 वर्ष मोहिने द्वारे जनजागृती केली आहे. त्यामुळे ऊस पाचट व्यवस्थापनाचे क्षेत्र वाढलेले आहे. परंतु योग्य […]
गोठ्यात अवैध गर्भलिंग-निदान केंद्र, दोन जण अटकेत
प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील नांजा वाडी येथे एका पत्र्याच्या गोठ्यात अवैध गर्भलिंग-निदान केंद्र चालवले जात असल्याचा पर्दाफाश झाला असून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. छाप्यात पोर्टेबल अल्ट्रासाऊंड उपकरण, गर्भपातासाठीच्या गोळ्या, मोबाईल फोन आणि रुग्णांचे संपर्क यासंबंधीचे कागदपत्रे जप्त करण्यात आली. तपासात अटक झालेल्या दोघांकडे कोणतीही वैद्यकीय पात्रता नसल्याचे […]
सोमेश्वरचे चेअरमन यांनी ३३००/- रू पहिली उचल जाहीर करून सभासदांची केली दिशाभुल ! – श्री सतिश काकडे
प्रतिनिधी सोमेश्वर साखर कारखान्याने सन २०२५-२६ गळीत हंगामासाठी ३३०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केल्यानंतर सभासदांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून कृती समितीचे प्रतिनिधी श्री. सतीश काकडे यांनी कारखान्याच्या या निर्णयावर “सभासदांची दिशाभूल करणारा” असा आरोप करत तात्काळ ३५०० रुपये प्रतिटन रक्कम सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची मागणी केली आहे. काकडे यांनी सांगितले की उस […]
श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात मंगळवार दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी ठीक १०.३० वा. प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना घोषणा फलक देण्यात आले होते त्यावर संविधानाविषयी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या प्रभात फेरी संपूर्ण […]
बारामती ! संविधान दिनानिमित्त होळ आठफाटा येथील शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप .
प्रतिनिधी – २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त होळ आठफाटा ग्रामपंचायत व परिसरातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे आयोजन होळ गावचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सुरज कांबळे यांच्यावतीने करण्यात आले होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. याप्रसंगी होळ […]
सोमेश्वर विद्यालयात संविधान दिन साजरा
सोमेश्वरनगर ( वा ), श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक येथे संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी गावातून ढोल ताशाच्या गजरात संविधान रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावेळी आपला अभिमान आपले संविधान अशा घोषणा देत जनजागृती केली. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी बुद्रुकचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात […]
ग्रामपंचायत निंबूत येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी. ग्रामपंचायत नींबूत येथे आज सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी नींबूत ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे यांनी संविधानाचे महत्त्व संविधानामुळे मिळालेले अधिकार याबाबत माहिती लोकांना दिले. या […]