Home

1 min read

*पाचवी व आठवीची वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी ३ एप्रिल रोजी होणार*

प्रतिनिधी. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळा, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी ३ एप्रिल रोजी वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयाने दिली आहे. इयत्ता ५ वी व ८ […]

1 min read

‘बर्ड फ्लू’ग्रस्त कोंबड्यांच्या सतत संपर्कात, अखेर कर्मचाऱ्यांचीच…

प्रतिनिधी नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूने संक्रमित साडेआठ हजार कोंबड्या मारण्यात आल्या. या संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील १५ कर्मचारी- अधिकाऱ्यांची महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी केली. नागपुरातील शासकीय प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात स्थायी व कंत्राटी असे सुमारे १५ अधिकारी- कर्मचारी सतत कोंबड्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून सगळ्यांची वैद्यकीय तपासणी केली. तुर्तास […]

1 min read

पैशांचा वाद, मित्रच निघाले मारेकरी

प्रतिनिधी नांदुरा येथे करण्यात आलेल्या अज्ञात युवकाच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून यातून धक्कादायक कारण बाहेर आले आहे. या युवकाचा त्याच्या तिघा घनिष्ठ मित्रांनी पैशांच्या कारणावरून खून केल्याचे निष्पन्न झाले. नांदुरा तालुक्यातील लोणवडी शिवारात एका युवकाचा मृतदेह आढळला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी तपास […]

1 min read

मंगळसूत्र चोरणाऱ्या सख्या भावासह दागिने खरेदी करणारा अटकेत

प्रतिनिधी भोसरी परिसरातून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन सख्या भावांना आणि चोरीचे दागिने विकत घेणा-याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ तोळे सोने, दुचाकी असा चार लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. अक्षय राजू शेरावत (वय २३), अजय राजू शेरावत (वय २२, दोघे रा. हिंगणगाव, हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, अनिल अंकुश […]

1 min read

तीन हजार रुपयांची लाच घेताना ‘जीएसटी’ कार्यालयातील महिला अधिकारी अटकेत

प्रतिनिधी वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी राज्यकर अधिकारी मालती रमेश कठाळे (वय ४३) यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात […]

1 min read

*माजी सैनिक विधवा पत्नी किंवा त्यांच्या अवलंबितासाठी चतु:श्रृंगी येथे महिला सुरक्षा रक्षक पदांची कंत्राटी भरती*

पुणे, दि. ७ : माजी सैनिक महामंडळातर्फे पुणे शहरातील चतु:श्रृंगी येथे माजी सैनिक विधवा पत्नी किंवा त्यांचे अवलंबिताकडून महिला सुरक्षा रक्षक पदे भरण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून इच्छुक आणि शारीरिकदृष्ट्या योग्य असलेल्या उमेदवारांनी सर्व कागदपत्रासह १५ मार्च पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पदासाठी […]

1 min read

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्यीतील हातभट्टीवाला एक वर्षासाठी एम.पी.डी.ए. कायदाअंतर्गत स्थानबद्ध

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयाज अवैध्य शस्त्र बाळगणारे, अंमली पदार्थ विक्री करणारे, अवैध्य वाळू व्यवसाय करणारे, अवैध्य दारु विक्री करणारे तसेच धोकादायक व्यक्तींविरुद्ध मा. पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी विशेष मोहिम राबवून कारवाई करत असताना पुणे ग्रामीण हद्यीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अवैध्य दारुची निर्मिती व विक्रीचा व्यवसाय करणारे दारुवाले यांची गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी तसेच […]

1 min read

बारामती.मेंढपाळ कुटुंबाच्या मेंढ्यांच्या कळपावर लांङग्यांचा हल्ला, हल्ल्यात दहा मेंढ्या ठार.

एकीकडे जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्यामुळे मेंढपाळांची मोठ्या प्रमाणावर फरपट होत आहे. स्वतः जगाव की पशुधन जगवावं या विवंचनेत मेंढपाळ असतानाच लांडग्याच्या कळपाने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून दहा मेंढ्या ठार झाल्याची घटना समोर आली. शेंङकरवाङीतील मेंढपाळ दादा महानवर, व तान्हूबाई महानवर यांच्या मेंढ्या खंङू भिवा लकङे यांच्या शेतात बसणी करीता आहेत. रात्री 2 वाजता चार […]

1 min read

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशाला बेदम मारहाण, लुटमारीत पाच हजार रूपये चोरले

प्रतिनिधी दिवसेंदिवस कल्याण रेल्वे स्थानका बाहेर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत आहेत. याविषयी प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सोमवारी रात्री तीन जणांनी नाशिक येथून आलेल्या एका प्रवाशाला कल्याण रेल्वे स्थानका बाहेर पकडून बेदम मारहाण केली. त्याच्या जवळील मोबाईल फोन आणि पाच हजार रूपये जबरदस्तीने काढून पळ काढला. एका प्रवाशाला जमिनीवर पाडून मारहाण केली जात […]

1 min read

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू

प्रतिनिधी लोकलने प्रवास करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. अश्विनी डोमडे (वय २७) असे या मयत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही महिला लोकलने प्रवास करत असताना लोकलमधून पडली. नाहूर रेल्वे […]