मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 6 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

पैशांचा वाद, मित्रच निघाले मारेकरी

mnewsmarathi 07 Mar 2024 1 मिनिट वाचन 9,017 वाचन

प्रतिनिधी

नांदुरा येथे करण्यात आलेल्या अज्ञात युवकाच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून यातून धक्कादायक कारण बाहेर आले आहे. या युवकाचा त्याच्या तिघा घनिष्ठ मित्रांनी पैशांच्या कारणावरून खून केल्याचे निष्पन्न झाले.

नांदुरा तालुक्यातील लोणवडी शिवारात एका युवकाचा मृतदेह आढळला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे

देण्यात आला. पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी तपास पथक नेमले. या पथकाने तपास करीत तिघा आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेतील मृताची ओळख पटली असून हर्षल उर्फ सदाशिव घोपे (३२, रा. घाटपुरी ता. खामगाव) असे त्याचे नाव आहे. पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादापायी बत्तीस वर्षीय हर्षलची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने तिघा मारेकऱ्यांना ६ मार्चच्या रात्री ताब्यात घेतले आहे. आकाश उर्फ आदिनाथ रावणकर (रा. घाटपुरी ता खामगाव), रुपेश कुरवाडे (रा. शेगाव), मयूर शेलार (रा.वाडी ता खामगाव) अशी आरोपीची नावे आहेत. त्यांनी खुनात वापरलेली टाटा इंडिका कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi