प्रतिनिधी –
शिक्षणाला वयाची अट नसते हे आजच्या काळात सुनील तात्या दिवार यांनी दाखवून दिले आहे . बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांनी वयाच्या ५० व्या वर्षी खडतर प्रयत्न करुन पहिल्याच टप्प्यात तीन वर्षात एल. एल. बी अभ्यासक्रम पूर्ण करून फर्स्ट क्लास ने मुंबई विद्यापीठातून परीक्षा उत्तीर्ण होऊन तरुण पिढी समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे,
धिवार यांनी सामाजिक जीवनात कार्यरत असताना त्यांनी बहुजन हक्क परिषदेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. पोलीस स्टेशन असेल महसूल प्रशासन असेल या ठिकाणी सर्व सामान्य मानंसाच्या हाकेला धावणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्व सामान्य जनमानंसात प्रतिमा आहे.
प्रस्थापित व्यवस्थेत अनेक गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही. कित्येकांना वकील मिळत नाही. गोरगरीब लोकांना पोलीस स्टेशन तहसील, कोर्ट यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी अधिकृत वकील म्हणून कोर्टात जाता यावे व त्यांच्या अडीअडचणी सोडवता यावेत या एकाच उद्देशाने मी वकिल झालो अभ्यासक्रम पूर्ण केला. माझा मोठा मुलगा दुर्गेश हा सुद्धा वकील आहे.
मी सुद्धा वकील व्हावं या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असणारे सेंट विल्फ्रेड कॉलेज पनवेल येथे ऍडमिशन घेऊन ही पदवी प्राप्त केली. ही पदवी प्राप्त करताना खऱ्या अर्थाने माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. कारण आईलाच असे वाटत होते की मी वकील व्हावे म्हणून परंतु माझ्या दुर्दैवाने आज माझी आई हयात नाही.
ती जर जिवंत असती तर निश्चितच हा आनंदोत्सव जल्लोष साजरा केला असता. माझी ही वकील ची पदवी मी माझ्या आईचा चरणी अर्पण करतो अशी प्रतिक्रिया सुनिलतात्या धिवार यांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली, यापुढे गोरगरीब जनतेचे सेवा करण्यासाठी मी या पदवीचा उपयोग करेल असे ही धिवार यांनी सांगितले.
कौटुंबिक आणि सामाजिक चळवळीची जबाबदारी सांभाळत तरुण पिढी समोर वेगळा आदर्श निर्माण करुन, सुनिल तात्यांनी एल.एल. बी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होते एल एल बी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल बहुजन हक्क परिषद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समिती, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुनर्वसन समिती जेजुरी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले आहे.