Home
मायलेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील घटना
प्रतिनिधी १३ वर्षीय मुलीसोबत आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास सावली तालुक्यातील खेडी शेतशिवारात उघडकीस आली. दर्शना दीपक पेटकर (३५) आणि समीक्षा दीपक पेटकर (१३) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. त्या मूल येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दर्शना यांनी समीक्षासह खेडी शेतशिवारातील विहिरीत उडी घेतली. त्यांना ग्रामीण […]
मॉडेलिंगसाठी मैत्रिणीला नेल्याने तरुणावर कोयत्याने वार
प्रतिनिधी मैत्रिणीला मॉडेलिंगसाठी नेल्याने सराइताने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना टिळक रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी सराइतासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ओम गायकवाड, त्याचे साथीदार आनंद, रोहन, सुमीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत राजकुमार शिंदे (वय १९, रा. लोहियानगर, गंज पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गायकवाड सराइत आहे. गायकवाडच्या […]
उपनिरीक्षकाच्या मोटारीतून दोन किलो मेफेड्रोन जप्त
प्रतिनिधी मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह अटक केलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याच्या मोटारीतून आणखी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. त्याला सकाळीच पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पिंपळेनिलख रक्षक चौकात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या नमामी झा या हॉटेल कामगाराला पोलिसांनी दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह […]
बारामती ! कोऱ्हाळे बु. यथे वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने गावबंद ठेऊन केला निषेध व्यक्त .
प्रतिनिधी – दि. 4 मार्च 2024 रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने भिवंडी येथील संकेत भोसले याच्या हत्येच्या निषेधार्थ त्याच्या मारेकऱ्यांना अटक होऊन फाशीची शिक्षा व्हावी यासंदर्भात कोऱ्हाळे बुद्रुक गाव बंद ठेवण्यात आले होते. या अल्पवयीन मुलाची हत्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपजिल्हाप्रमुख व त्याच्या साथीदारांनी मिळून केली होती . तसेच मारत असतानाचे व्हिडिओ […]
पाउल महिला दिनानिमित्य आधारवड बालरक्षक सप्ताह मधील अलौकीक कार्य करणाऱ्या बालरक्षक भगिनीचा भावस्पर्श…..*
प्रतिनिधी. कोरोनाचा हाहाकार माजला होता शाळा बंद होत्या. आमची टिम भांद्री येथे उन्हाळयाच्या सुट्टीतील गावआराखडा तयार करित होतो. नऊ वाजता कॉल आला ‘ मी शबनम बोलतेय दादा दौंडवरून . मला बालरक्षक चळवळीत काम करायचे आहे आणि काय करता येईल ? ” आज प्रथमतः इंग्रजी माध्यमाच्या कायमविनाअनुदानित शाळेच्या मॅडमचे या कामाविषयी मला विचारणे झाले होते. घरापासून […]
जेजुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ५ लाख २४ हजाराचा हातभट्टीचा माल जप्त करत केला गुन्हा दाखल.
प्रतिनिधी. दि.४/३/२०२४ रोजी रात्री १ वा सुमारास ढालेवाडी गावच्या हद्दीत संतोष सुभाष राठोड रा. ढालेवाडी ता.पुरंदर जि.पुणे ही व्यक्ती नाझरे धरणाच्या शेजारी परदेशी यांच्या शेतात विहिरीजवळ झाडाच्या झुडपाच्या आडोशाला दारू तयार करनारी भट्टी जेजुरी पोलिसांना आढळून आले . त्याठिकाणी मिळून आलेल्या माल खालीलप्रमाणे १) ३.५०.००० रू २ लोखंडी पातले त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी […]
नागभीडमध्ये तिहेरी हत्याकांड, पतीने पत्नी व दोन मुलींची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या
प्रतिनिधी कौटुंबिक कलहातून पती अंबादास तलमले (५०) याने पत्नी अल्का तलमले (४०), मोठी मुलगी प्रणाली तलमले (२०), लहान मुलगी तेजू तलमले (२०) या तिघांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील मौशी या गावात घडली. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती अंबादास तलमले पत्नी अल्का, दोन मुली […]
टास्क फसवणुकीतील रकमेतून सोने खरेदी, आरोपीला अटक
प्रतिनिधी टास्क फसवणुकीतील आरोपीला अपहार केलेल्या रक्कमेतून सोने खरेदी करणे महागात पडले आहे. त्याच माहितीच्या आधारे बोरिवली पोलिसांनी त्याला मालाडमधून अटक केली. मोहम्मद इम्रान जमाल मोहम्मद (५०) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे. तक्रारदार बोरिवली पोलिसांच्या हद्दीत राहतात. त्यांना व्हाट्सअपवर, जीबीएल डिजिटल मार्केटिंगमधून बोलत आहे असे भासवून नोकरीचे आमिष दाखवण्यात […]
तब्बल २० लाखांची लाच; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा सरव्यवस्थापक जाळ्यात
प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचा स्वच्छ कारभार आणि पारदर्शक प्रक्रिया असल्याचा दावा संबंधित मंत्री नेहमी करतात. मात्र, कंत्राटदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याशिवाय कोणतेही काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणातील अधिकारी करीत नसल्याचे समोर आले. केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) सरव्यवस्थापक अरविंद काळे याला २० लाखांची लाच घेताना अटक केली. सीबीआयने काळे याच्या घरात झाडाझडती घेत एकूण ४५ लाख […]
चोरट्यांनी सीसीटीव्हीवर ब्लॅक स्प्रे मारून गॅस कटरने एटीएम फोडले, २१ लाखांची रोकड लंपास
प्रतिनिधी एटीएम मशीन बाहेर असलेल्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यावर चोरट्यांनी काळा स्प्रे मारून गॅस कटरने एटीएम मशीन फोडून सुमारे २१ लाखांची रोकड लंपास केली. ही घटना शहरातील दाते कॉलेज चौकात शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हरियाणातील सराईत टोळीने हे कृत्य केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील […]