मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 5 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

मॉडेलिंगसाठी मैत्रिणीला नेल्याने तरुणावर कोयत्याने वार

mnewsmarathi 06 Mar 2024 1 मिनिट वाचन 8,811 वाचन

प्रतिनिधी

मैत्रिणीला मॉडेलिंगसाठी नेल्याने सराइताने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना टिळक रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी सराइतासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी ओम गायकवाड, त्याचे साथीदार आनंद, रोहन, सुमीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत राजकुमार शिंदे (वय १९, रा. लोहियानगर, गंज पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गायकवाड सराइत आहे. गायकवाडच्या मैत्रिणीला वेदांतने मॉडेलिंगसाठी नेले होते. त्यामुळे गायकवाड वेदांतवर चिडला होता.

मंगळवारी सायंकाळी आरोपी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी वेदांतला टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय परिसरात गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन चौघे जण पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे तपास करत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi