Home
परवानगीशिवाय डिजिटल प्रचार; गुप्त जाहीरात–व्यवहार व WhatsApp प्रचारावर आयोगाचा कडक इशारा
प्रतिनिधी नगरपरिषद/नगरपालिका निवडणूक 2025 संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना सरळ आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे की, परवानगीशिवाय डिजिटल, सोशल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर चालणारा कोणताही प्रचार हा सरळसरळ गुन्हा मानला जाईल आणि अशा प्रकारांची दखल घेतल्यास उमेदवारांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. आयोगाने स्पष्ट केले आहे की रील्स, व्हिडिओ, ग्राफिक्स, बूस्टेड पोस्ट, पेड प्रमोशन, डिजिटल न्यूज […]
जिल्ह्यामध्ये सोमेश्वरने फोडली पहिल्या हप्त्याची कोंडी
प्रतिनिधी चालू गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसासाठी प्रथम हप्ता रु.३३००/-प्र.मे.टन प्रमाणे देणेचे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जाहिर केले आहे. कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबर पासून चालू असून सध्या १०,००० मे.टन प्रतिदिन क्षमतेने गाळप होत आहे. आजअखेर एकूण २,०४,२५५ मे. टन गाळप झाले असून जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १,९८,१०० क्विटल इतके साखरेचे […]
पुणे जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा नींबूत मध्ये पडल्या पार.
प्रतिनिधी. पुणे जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नींबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये जवळपास सहा जिल्हा परिषद च्या शाळांनी सहभाग नोंदवला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे, नींबूत ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच अमरदीप काकडे विद्यमान ग्रामपंचायत […]
कोऱ्हाळे बुद्रुक येथील लव्हे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला कचऱ्याचे साम्राज्य
प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक गावातील नीरा बारामती रस्त्यावरून लव्हेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा व राडारोडा टाकल्याने त्या भागात राहणाऱ्या लोकांचे व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रस्त्याला नेहमीच चायनीज व चिकन विक्रेत्यांचा राडारोडा, केशकर्तनालयातील केस, फाटकी कपडे, जेवणावळीतील पत्रावळ्या, मृत जनावरे, दुकानातील कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसराला मोठी दुर्गंधी येते. वस्तीकडे जाताना नाकाला रुमाल […]
निबुत मध्ये शेतातील विद्युत मोटर चोरीचे सत्र सुरूच.
प्रतिनिधी. मागील अनेक दिवसांपासून नींबूत व नींबूत परिसरातील शेतीतील मोटर चोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेईन शेतकऱ्याने पै पै जोडून शेतातील उभ्या पिकाला पाणी देण्याकरिता हजारो रुपये खर्च करून विद्युत संच विकत घेतले मात्र काही विकृत विचारांच्या भुरट्या चोरांमुळे शेतकऱ्याचे शेतातील उभे पीक जळून जाण्याच्या मार्गावरती आले आहे शनिवारी रात्री ज्ञानेश्वर भुजंगराव काकडे यांच्या शेतातील […]
अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली
प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार ओळखपत्र आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्डांवर नाव, फोटो किंवा क्रमांक अशी कोणतीही माहिती छापलेली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार हे कार्ड साफसफाईदरम्यान आढळून आले. व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या असून अनेकांनी […]
पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 निमित्त निरा–मोरगाव रस्ता 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत बंद
प्रतिनिधी. डांबरीकरणाच्या अंतिम टप्प्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येणाऱ्या पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा 2026 आणि निरा–मोरगाव रस्त्यावर सुरू असलेल्या अंतिम डांबरीकरणाच्या कामांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या अहवालानुसार या रस्त्याचे बिटुमिन काँक्रीटचे अंतिम थराचे काम वेगाने आणि एकाच […]
श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न…
प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर .२०२५ रोजी ज्युबिलंट भारतीया फाउंडेशनच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा व प्रात्यक्षिके कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैय्या शिवाजीराव काकडे देशमुख […]
कुंडली
[prokerala-astro tool=”kundli”]
कृषी विभाग बारामती तालुका यांच्यावतीने सदोबाची वाडी येथे कृषी मेळाव्याचे आयोजन.
प्रतिनिधी. सदोबाचीवाडी ता. बारामती येथे कृषि विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोषण अभियान पौष्टिक कडधान्य योजनेअंतर्गत राज अग्रो शेतकरी गटास हरभरा बियाणे वितरित करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे सर , उप विभागीय कृषि अधिकारी तुकाराम चौधरी सर व तालुका कृषि अधिकारी श्री. सचिन हाके सर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर मंडळामद्धे हरभरा पिकाचे पाच […]